नवी दिल्ली, 28 जानेवारी : इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आहे. या शहराच्या सीमेवर असलेल्या नेव्ह याकोव्ह येथील एका प्रार्थनास्थळावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाले आहेत.
इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. फिलिस्तानच्या इस्त्रायल सैनिकांच्या कारवाईमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. या कारवाईनंतर लगेच दुसऱ्या दिवशी जेरूसलेममध्ये ही घटना घडली. इस्रायलच्या परदेश मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितलं आहे.
Visuals from the spot on the outskirts of Jerusalem where a shooting incident has left 7 people dead so far along with leaving 10 people wounded. (Source: Reuters) pic.twitter.com/sQczpkE7Gy
— ANI (@ANI) January 27, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही घटना गुरुवारी जेनिन शहरात एका शरणार्थी शिबिरावर इस्त्रायल सुरक्षा दलाच्या जवानाने हल्ला केला होता. या कारवाईमध्ये एक वृद्ध महिलेसह 9 जणांचा मृत्यू झाला होता.
(मशिदीसमोर भीक मागायची महिला, चौकशी केल्यावर पोलिसही हादरले)
विशेष म्हणजे, इस्त्रायल सुरक्षा दलाच्या कारवाईमध्ये मागील वर्षभरात 29 फिलिस्तानी नागरिकांचा मृ्त्यू झाला आहे. तसंच गाजामधून होत असलेल्या रॉकेट हल्लाला प्रत्युतर देण्यासाठी इस्त्रायल सैनिकांनी गाजा पट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले आहे.
(Russia Ukraine War: रशियाकडून पुन्हा मिसाईल आणि ड्रोनने हल्ला, 11 जणांचा मृत्यू)
हमास ही दहशतवादी संघटना गु्प्तपणे गाजामधील मगाजी शरणार्थी शिबिरामध्ये रॉकेट तयार करण्याचा कारखाना चालवत होते. इस्त्रायल सैनिकांनी तो कारखाना उधळून लावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.