S M L

जेरूसलेम हीच इस्त्राईलची राजधानी -ट्रम्प यांची घोषणा

1948 पासून इस्त्राईलची राजधानी तेल अवीव आहे. अरब देश आणि युरोपनं ट्रम्प यांच्या या घोषणेला तीव्र विरोध केलाय. जेरूसलेम हे शहर शेकडो वर्षांपासून वादात आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 7, 2017 09:21 AM IST

जेरूसलेम हीच इस्त्राईलची राजधानी -ट्रम्प यांची घोषणा

07 डिसेंबर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा घात घातलाय. जेरुसलेम हीच इस्रायची राजधानी असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय.

1948 पासून इस्त्राईलची राजधानी तेल अवीव आहे. अरब देश आणि युरोपनं ट्रम्प यांच्या या घोषणेला तीव्र विरोध केलाय. जेरूसलेम हे शहर शेकडो वर्षांपासून वादात आहे. आणि 1948 पासून या वादात भर पडली. कारण इस्त्राईल देशाची स्थापना झाल्यावर शहराचा एक भाग ज्यूंच्या अधिपत्याखाली आला. आजही एका भागावर पॅलेस्टाईनचा दावा आहे.

कागदावर असलेल्या पॅलेस्टाईनचा जेरूसालेम हा अविभाज्य भाग आहे.  असा संपूर्ण अरब जगताचा समज आहे. आता ट्रम्प यांनी जेरूसलेमला राजधानी घोषित करून संपूर्ण अरब जगताचा रोष ओढवून घेतलाय. पण कट्टर उजव्या विचारांचे लोक खूश झालेत. खरंतर या उजव्यांच्याच जोरावर ट्रम्प निवडून आले होते. इस्त्राइलला तर आनंदच झालाय. आतापर्यंतच्या अमेरिकेच्या सर्व अध्यक्षांनी हे करणं टाळलं होतं. पण ट्रम्प यांचं तसं नाही. ते घोषणा करून मोकळे झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 09:21 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close