मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेजोस यांच्या घटस्फोटित पत्नीनं शिक्षकासोबत बांधली लग्नगाठ

जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेजोस यांच्या घटस्फोटित पत्नीनं शिक्षकासोबत बांधली लग्नगाठ

मॅकेन्झी स्कॉट (MacKenzie Scott married with teacher) यांनी सिएटलमधील एका विज्ञान शिक्षक डॅन जेनेट यांच्याशी विवाह केला आहे. क्रोनिकल ऑफ फिलांथ्रोपीने गेल्यावर्षी सर्वाधिक दान करणाऱ्या 50 अमेरिकी नागरिकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये मॅकेन्झी दुसऱ्या स्थानी होत्या.

पुढे वाचा ...

वॉशिंग्टन 08 मार्च : अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या दानशूर व्यक्ती (फिलांथ्रोपिस्ट), लेखिका आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (Amazon founder Jeff Bezos) यांच्या आधीच्या पत्नी मॅकेन्झी स्कॉट (MacKenzie Scott married with teacher) यांनी सिएटलमधील एका विज्ञान शिक्षक डॅन जेनेट यांच्याशी विवाह केला आहे. मोठ्या प्रमाणात संपत्ती दान करून चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीचा पार्टनर होऊन तशाच प्रकारचं दानाचं उत्तम काम करण्याचं अहोभाग्य मला लाभलं आहे. याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो, असं म्हणत डॅन यांनी मॅकेन्झींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

द गिव्हिंग प्लेज (Giving Pledge) या एनजीओच्या वेबसाइटला लिहिलेल्या पत्राद्वारे डॅन यांनी या लग्नाबद्दलची घोषणा केली. त्यात ते म्हणतात, आयुष्यात मी प्रचंड संपत्ती दान करण्याबाबत बोलू शकेन आणि अनेकांची आयुष्य बदलून टाकण्याची संधी मला मिळेल असा विचार मी कधी स्वप्नातही केला नव्हता. डॅन हे गेली अनेक वर्ष शिक्षक म्हणून काम करतात आणि नुकतंच एका खासगी शाळेमध्ये ते केमिस्ट्री हा विषय शिकवत होते. याच शाळेत स्कॉट यांची मुलं शिकत होती.

डॅन यांनी पत्रात म्हटलं, की हा काय छान योगायोग जुळून आला. मी सगळ्यात चांगल्या आणि दानशूर व्यक्तीसोबत विवाह केला आहे आणि इथून पुढं हे दान गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी मीदेखील तिच्यासोबत काम करणार आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात स्कॉट यांनी एनजीओ, विद्यापीठं, कम्युनिटी डेव्हलपमेंट ग्रुप आणि कायद्यासंबंधीच्या संघटना अशा एकूण 116 संस्थांना 1.68 बिलियन अमेरिकी डॉलर दान केले. त्यानंतर त्यांनी दानासंबंधी त्यांना सल्ला देणाऱ्या समितीला सांगितलं होतं, की त्यांना दानाचा वेग वाढवायचा असून कोरोना महामारीचा फटका बसलेल्यांना मदत करायची त्यांना इच्छा आहे.

स्कॉट यांनी 512 सामाजिक संघटनांना सात आणि आठ अंकी रक्कम दान करणार असल्याचं सांगून तशा संस्था शोधायला सामाजिक कार्यकर्त्यांना संगितलं होतं. यात फुड बँक, मानव-सेवा संघटना आणि रेशियल जस्टिस चॅरिटींचा समावेश होता. मॅकेन्झी स्कॉट यांनी 2020 मध्ये 5.7 बिलियन अमेरिकी डॉलर्स दान केले आहे. क्रोनिकल ऑफ फिलांथ्रोपीने गेल्यावर्षी सर्वाधिक दान करणाऱ्या 50 अमेरिकी नागरिकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये मॅकेन्झी दुसऱ्या स्थानी होत्या. जेफ बेझोस यांनी बेझोस अर्थ फंड सुरू करून 10 बिलियन अमेरिकी डॉलर्सचं दान केलं आणि त्यांनी या यादीत पहिलं स्थान पटकावलं होतं.

First published:

Tags: Amazon, Marriage, Relationship, Shocking news, Teacher, Wife and husband