होय, प्रेम आंधळं असतं ; जपानच्या राजकुमारीने प्रेमासाठी राजेशाही थाट सोडला

होय, प्रेम आंधळं असतं ; जपानच्या राजकुमारीने प्रेमासाठी राजेशाही थाट सोडला

जपानच्या राजेशाही कुटुंबातील प्रिंस अकिसीनो आणि कीको यांची मुलगी माकोने प्रेमासाठी राजेशाही थाटबाट सोडून सर्वसामान्य कुटुंबातील मुलाशी लग्न करायचं ठरवलंय.

  • Share this:

20 मे : प्रेम आंधळं असतं...याचा प्रत्यय नुकताच जपानमध्ये आलाय. जपानच्या राजेशाही कुटुंबातील प्रिंस अकिसीनो आणि कीको यांची मुलगी माकोने प्रेमासाठी राजेशाही थाटबाट सोडून सर्वसामान्य कुटुंबातील मुलाशी लग्न करायचं ठरवलंय.

२५ वर्षांची माको एका सामान्य कुटुंबातील मुलाच्या प्रेमात पडली आहे. 25 वर्षांचा कोमुरो हा तरुण पदवीधर असून एका बीचवर पर्यटन कर्मचारी आहे. माको आणि कोमुरो यांची प्रेमकथा ही एका सिनेमातल्या लव्हस्टोरीप्रमाणेच आहे. माको-कोमुरो यांची पहिली भेट पाच वर्षांपूर्वी एका मित्राच्या पार्टीत झाली होती. त्यानंतर हे दोघे प्रेमात पडले आणि आता लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. या दोघांनी एका चर्चमध्ये विवाह केला असल्याची चर्चाही आहे.

विवाहापूर्वी येथील पादरीने माको हिला सांगितले होते की, विवाहानंतर ती राजकुमारी राहणार नाही. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे तिला जीवन जगावं लागेल. पण माको मागे हटली नाही आणि तिने कोमुरोशी विवाह केला. माकोच्या कुटुंबियांचाही या विवाहाला विरोध नाही. लवकरच रीतीरिवाजाप्रमाणे या दोघांचा विवाह करून देण्यात येणार आहे. शिवाय माको या कुटुंबातील अशी पहिली मुलगी आहे जी राजेशाही थाट सोडून बाहेर पडून विद्यापीठात जाऊन शिक्षण घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2017 06:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading