ट्रम्प यांच्यासमोर गोल्फ खेळताना खड्ड्यात पडले जपानचे पंतप्रधान !

हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि एकच हास्यकल्लोळ उडाला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2017 11:21 PM IST

ट्रम्प यांच्यासमोर गोल्फ खेळताना खड्ड्यात पडले जपानचे पंतप्रधान !

13 नोव्हेंबर : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळत असताना शिंजो आबे एका खड्यातच पडले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियाई देशांच्या दौऱ्यावर  जपानमध्ये पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी गोल्फ खेळणे पसंत केलं.  त्यावेळी ट्रम्प यांच्यापासून काही अंतरावर असलेले शिंजो आबे यांचा अचानक तोल गेला आणि ते एका खड्यात पडले. लगेच आबे यांनी आपला तोल सावरत उभे राहिले. हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि एकच हास्यकल्लोळ उडाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 11:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...