मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कर्मचाऱ्यांना आता ऑफिसमध्येच घेता येणार डुलकी; पण...

कर्मचाऱ्यांना आता ऑफिसमध्येच घेता येणार डुलकी; पण...

जगभरात रोजगाराची वेगवेगळी क्षेत्रं आहेत आणि त्यात अब्जावधी कर्मचारी काम करतात. तथापि, प्रत्येक देशाचे कामाचे कायदे, नियम (Working Law And Rules) वेगवेगळे आहेत.

जगभरात रोजगाराची वेगवेगळी क्षेत्रं आहेत आणि त्यात अब्जावधी कर्मचारी काम करतात. तथापि, प्रत्येक देशाचे कामाचे कायदे, नियम (Working Law And Rules) वेगवेगळे आहेत.

जगभरात रोजगाराची वेगवेगळी क्षेत्रं आहेत आणि त्यात अब्जावधी कर्मचारी काम करतात. तथापि, प्रत्येक देशाचे कामाचे कायदे, नियम (Working Law And Rules) वेगवेगळे आहेत.

जगभरात रोजगाराची वेगवेगळी क्षेत्रं आहेत आणि त्यात अब्जावधी कर्मचारी काम करतात. तथापि, प्रत्येक देशाचे कामाचे कायदे, नियम (Working Law And Rules) वेगवेगळे आहेत. काही देशांमध्ये आठवड्यातून तीन दिवस सुट्टी आणि चार दिवस काम करावं लागतं, तर काही ठिकाणी कामाची शिफ्ट जास्त कालावधीची असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिफ्टदरम्यान थकल्याने झोप (Sleep) येऊ लागते. जपानमध्ये (Japan) अशा कर्मचाऱ्यांसाठी खास व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी कामाच्या दरम्यानदेखील थोडा वेळ झोप घेऊ शकतील. टोकियोमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जपानमधल्या दोन प्रसिद्ध फर्निचर कंपन्यांनी या खास व्यवस्थेचं डिझाइन सादर केलं आहे. ज्या ऑफिसेसमध्ये कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांना 10 ते 12 तास काम करावं लागतं, अशा ठिकाणी आता नॅप बॉक्सेस (Nap box) बसवले जाणार आहेत. जपानमधल्या इटोकी (Itoki) आणि कोयजू प्लायवूड कॉर्पोरेशन (Koyju Plywood Corporation) या फर्निचर सप्लायर्सनी एक खास नॅप बॉक्स तयार केला आहे. यामध्ये मोठ्या शिफ्टमधले (Shift) कर्मचारी झोपू शकतात; मात्र यासाठी अट एवढीच आहे, की त्यांना या बॉक्समध्ये आडवं न होता उभंच राहून झोपावं लागेल. ('या' देशात किड्यांना आकर्षित करण्यासाठी खेळवली जाते ‘वर्ल्ड वर्म चार्मिंग चॅम्पियनशिप’) कल्पना कुठून आली? 'मिरर'च्या वृत्तानुसार, टोकियोमधल्या एका कार्यक्रमादरम्यान या दोन कंपन्यांनी ही कल्पना मांडली. इटोकी आणि कोयजू प्लायवूड कॉर्पोरेशनने या नॅप बॉक्सचं डिझाइन तयार केलं आहे. या कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं ब्लूमबर्ग न्यूजशी बोलताना सांगितलं, `जपानमधल्या अनेक कंपन्यांचे कर्मचारी आराम करण्यासाठी काही वेळ स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेतात. ही कृती आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यांनी थोडा वेळ डुलकी घेऊन पुन्हा फ्रेश होऊन कामाला लागणं चांगलं ठरतं.`जपान हा जगातले सर्वांत जास्त कामाचे तास असलेल्या मोजक्या देशांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत ऑफिसेसमध्ये असा बॉक्स ठेवल्यानं कर्मचाऱ्यांना आराम मिळेल आणि यामुळे ते ताजेतवाने होऊ शकतील, असा कंपन्यांना विश्वास आहे. उभं राहून झोपण्याची व्यवस्था नॅप बॉक्सचं जे डिझाइन समोर आलं आहे त्यानुसार कर्मचारी नॅप बॉक्समध्ये सरळ उभं राहून (Standing up straight) पॉडमध्ये डुलकी घेऊ शकतील. डुलकी घेताना बॉक्समधली व्यक्ती पडणार नाही, अशा प्रकारे रचना केली गेली आहे. ही सुविधा अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी त्यात आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. हे विचित्र स्लीप स्टेशन एखाद्या स्लिम वॉटर हीटरसारखं दिसतं. यात डोकं आणि गुडघ्यांना आधार मिळावा यासाठी खास सुविधा देण्यात आली आहे.
First published:

पुढील बातम्या