'या' देशात तुरुंगात जाण्यासाठी वृद्ध व्यक्ती मुद्दाम गुन्हे करतायत
तुरुंगात एकटेपण दूर होतं, सेवा मिळते म्हणून वृद्ध व्यक्ती मुद्दामहून गुन्हे करून तुरुंगात जातायत. वाचा या देशाबद्दल

तुम्ही कधी असा विचार केला असेल, की एकटेपणाला घाबरून कुणी तुरुंगात जात असेल? तर जपानमध्ये वृद्ध व्यक्ती सध्या याच रस्त्यावरून जात आहेत.

जपानमध्ये सर्वात वृद्ध माणसं जपानमध्ये आहेत.जपानच्या एकूण लोकसंख्येच्या 27.3 टक्के लोक 65 वर्षाहून जास्त वयाचे आहेत.

जपानमध्ये जन्मदर घटतोय. वृद्धांची संख्या वाढतेय.

जपानमध्ये 2025पर्यंत प्रत्येक 3 व्यक्तींच्या मागे 1 माणूस 65 वर्षांचा असेल.

याचा परिणाम पेंशनवरही पडतोय. त्यामुळे जपानमध्ये पाच नागरिकांपैकी एक जण दारिद्र्य रेषेखाली येतो.

जपानमध्ये सहा सीनियर सिटिझन्सपैकी एक जण एकटा राहतोय. त्यांची मुलं बाहेरगावी काम करतायत.

त्यामुळे वृद्ध माणसं जाणूनहुजून छोटामोठा गुन्हा करतायत. चोऱ्या करतायत. कोणाला मारपीट करतायत. काहींनी तर खूनही केलेत. म्हणजे त्यांना तुरुंगात राहायला मिळेल.

तुरुंगात त्यांना डोक्यावर छप्पर मिळतंय. जेवण मिळतंय. बऱ्याच सुविधा फ्री मिळतायत.

जपानच्या तुरुंगात स्वतंत्र रुम मिळते. त्यात लाकडी बेड असतो. खुर्ची, टेबल असतं. कधी टीव्हीही असतो.

जपानमध्ये तीन कैद्यांमध्ये दोघांना आजार असतो. बऱ्याचदा तो मानसिकही असतो.

तुरुंगातल्या कर्मचाऱ्यांना रुग्णाचं डायपर बदलणं, आंघोळ घालणं ही कामं करावी लागतात.

घरी एकटं राहण्यापेक्षा हे कैदी तुरुंगात राहणं पसंत करतात. 65 वर्षापेक्षा जास्त कैद्यांची संख्या 19 टक्के आहे.

याचा परिणाम जपानच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. तिथे एका कैद्याचा वर्षाचा खर्च 20 लाख 80 हजार रुपये आहे.

पुन्हा या कैद्याची शिक्षा संपली की त्यांचं पुनर्वसन करायलाही खर्च पडतोच.

कैदी परत गुन्हे करून तुरुंगात येतायत.जपानमध्ये तुरुंगासाठी बजेट वाढवावं लागतंय. 2015मध्ये हे बजेट 15 हजार कोटी रुपये होतं.

जपानमध्ये तुरुंगासाठी बजेट वाढवावं लागतंय. 2015मध्ये हे बजेट 15 हजार कोटी रुपये होतं.

वृद्ध कैद्यांची संख्या इतकी वाढतेय की जपानमध्ये 2018ला अजून 2 नवे तुरुंग बनवावे लागले.
First Published: Jan 18, 2019 07:20 PM IST