जपानचे PM शिन्झो अबे देणार राजीनामा, प्रकृती खालावत असल्यामुळे घेणार निर्णय

जपानचे PM शिन्झो अबे देणार राजीनामा, प्रकृती खालावत असल्यामुळे घेणार निर्णय

जपानी माध्यमांनुसार शिन्झो अबे यांची प्रकृती सतत खालावत आहे. यामुळे, ते कामाकडे लक्ष देऊ शकत नाही, अशा परिस्थितीत ते आज राजीनामा देऊ शकतात.

  • Share this:

टोकियो, 28 ऑगस्ट : जपानचे पंतप्रधान शिन्झो अबे (shinzō abe) आपला राजीनामा जाहीर करु शकतात. गेल्या बर्‍याच दिवसांपासून ते आजारी आहे, काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. दरम्यान, जपानच्या मीडियाने असे वृत्त दिले आहे की, शिन्झो अबे आज पत्रकार परिषदेत घेऊन आपला राजीनामा देऊ शकतात.

जपानी माध्यमांनुसार शिन्झो अबे यांची प्रकृती सतत खालावत आहे. यामुळे, ते कामाकडे लक्ष देऊ शकत नाही, अशा परिस्थितीत ते आज राजीनामा देऊ शकतात. शिन्झो अबे यांच्या प्रकृतीविषयी बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. प्रकृती सतत ढासळत असल्यामुळे शिन्झो यांना कामही करता येत नव्हते. दोनवेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आता शिन्झो राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

याआधी 18 ऑगस्ट रोजी शिन्झो अबे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळजवळ सात तास त्यांच्यावर उपचार सुरू होते. माध्यमांतून बऱ्याच अफवा समोर आल्यानंतर पंतप्रधान कार्यालयालानं शिन्झो यांच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिले होते.

2007मध्ये पंतप्रधान कार्यकाळातील सुरुवातीच्या काळात शिन्झो यांनी प्रकृती खालवल्यामुळे विश्रांती घेतली होती. 2006 मध्ये काही काळ देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी शिन्झो आबे हे 2012 पासून जपानचे पंतप्रधान आहेत. जपानमध्ये कोरोनाचा प्रसार वेगानं होत असताना शिन्झो यांनी कडक नियम लागू केले होते. यामुळे आता जपानमधील कोरोनाची परिस्थिती काही अंशी आटोक्यात आली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 28, 2020, 11:40 AM IST

ताज्या बातम्या