3 वर्षांच्या लेकीला एकटं टाकून बॉयफ्रेंडला भेटायला गेली आई, अशी झाली होती बाळाची अवस्था

3 वर्षांच्या लेकीला एकटं टाकून बॉयफ्रेंडला भेटायला गेली आई, अशी झाली होती बाळाची अवस्था

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी महिलेने, मुलगी स्वतःहून खाऊ-पिऊ शकणार नाही हे तिला माहित नव्हतं, असे सांगितले.

  • Share this:

टोकियो, 09 जुलै : जपानमध्ये एक अशी घटना समोर आली आहे, ज्यानं सर्वांना हादरून सोडलं आहे. इथं 24 वर्षांची आई आपल्या 3 वर्षाच्या मुलीला 8 दिवसांसाठी घरात एकटं टाकून प्रियकराला भेटायला गेली. घरात एकट्या मुलीकडे खाण्यासाठी किंवा पाण्यासाठी काहीच नव्हते. जेव्हा 8 दिवसांनी ही महिला घरी परतली तेव्हा बाळाची अवस्था पाहून तिलाच धक्का बसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षांच्या चिमुरडीकडे खाण्यासाठी आणि पिण्यासाठी काहीच नव्हते. त्यामुळं उपाशी राहून चिमुरडीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या बाळाच्या आईला अटक केली आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी महिलेने, मुलगी स्वतःहून खाऊ-पिऊ शकणार नाही हे तिला माहित नव्हतं, असं सांगितलं.

वाचा-सकाळी केले आईवर अंत्यसंस्कार, संध्याकाळी रुग्णालयातून शव घेऊन जाण्यासाठी आला फोन

डेली मेलच्या वृत्तानुसार या महिलेचे नाव साकी काकेहाशी आहे. आपल्या प्रियकराला भेटायला ती 600 मैल गाडी चालवत गेली. तिला घरी परतण्यासाठी एकूण 8 दिवस लागले. यावेळी गैरसोय होऊ नये म्हणून तिनं आपल्या तीन वर्षाच्या मुलीला घरी एकटे सोडले. महिलेने पोलिसांना सांगितले की, ती घरी परतली तेव्हा तिची मुलगी जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तिनं त्याने तातडीने डॉक्टरांना फोन केला पण त्यांनी दोन दिवसांपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

वाचा-मुलाच्या मृत्यूचा बापानं घेतला बदला! महिलेचं शीर घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात

गेल्या वर्षीच या महिलेचे घटस्फोट झाला होता. मुलीच्या हत्येप्रकरणी साकीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलीची प्रकृती खूपच वाईट होती आणि बर्‍याच दिवसांपासून तिचे कपडे, डायपरही बदलले नव्हते. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मुलीचे निर्जलीकरण आणि उपासमारीने मृत्यू झाले. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या अपार्टमेंटची परिस्थिती अत्यंत वाईट होती आणि तेथे खाण्यापिण्यासाठी काहीच नव्हते.

वाचा-'गँगस्टर विकास दुबेला जाळून मारा', शहीद पोलिसाच्या भावाची मागणी

Published by: Priyanka Gawde
First published: July 9, 2020, 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading