Home /News /videsh /

अणुप्रकल्पाचं रेडिओअॅक्टिव्ह पाणी जपान सोडणार समुद्रात; भारताला भोगावे लागणार भयंकर दुष्परिणाम

अणुप्रकल्पाचं रेडिओअॅक्टिव्ह पाणी जपान सोडणार समुद्रात; भारताला भोगावे लागणार भयंकर दुष्परिणाम

जपानच्या क्योडो न्यूज (Kyodo News) या प्रमुख वृत्तपत्राने एक खळबळजनक वृत्त देऊन जगाला हादरवलं आहे.

    टोकियो, 19 ऑक्टोबर : जपानच्या (Japan news) क्योडो न्यूज (Kyodo News) या प्रमुख वृत्तपत्राने एक खळबळजनक वृत्त देऊन जगाला हादरवलं आहे. फुकूशिमा अणुप्रकल्पात साठलेलं रेडिओअॅक्टिव्ह गुणधर्माचं पाणी (Radioactive water from nuclear plant) समुद्रात सोडून द्यायचा विचार तिथलं सरकार करत असल्याची ही विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. जपानने असं केलं तर भारतासकट जगातल्या अनेक देशांना पुढची कित्येक वर्षं भयंकर परिणामांना सामोरं जायला लागणार आहे. वाचा नेमकं काय आहे हे प्रकरण? जपानमध्ये 9 वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीमुळे फुकूशिमा येथील अणू प्रकल्पाचं (Fukushima nuclear power plant japan) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे या ठिकाणी लाखो टन रेडिओऍक्टिव्ह गुणधर्माचं पाणी जमा झालं असून हे पाणी समुद्रात सोडण्याचा जपान विचार करत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांची चिंता वाढली असून हे पाणी त्यांच्याजवळील समुद्रात आल्यास मोठा धोका आणि हानी पोहोचू शकते. हा रेडिओऍक्टिव्ह कचरा नक्की काय आहे आणि यामुळे काय धोका उद्भवू शकतो हे आपण पाहणार आहोत. काय आहे प्रकरण फुकुशिमा येथील अणू प्रकल्पामध्ये जवळपास 12 लाख टन रेडिओऍक्टिव पाणी आहे. पुढील वर्षी टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा धोका आणि हानी पोहोचू नये म्हणून जपान हे पाणी समुद्रात सोडण्याचा विचार करत आहे. हे ठिकाण ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणापासून 60 किलोमीटर लांब आहे. पण जपान कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. पेपरमध्ये योग्य बातमी यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून जपानमधील मुख्य वृत्तपत्र Kyodo News यांनी अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. त्यामुळे जपानमधील मासेमारी करणाऱ्यांनी याला विरोध दर्शवला असून व्यवसाय ठप्प होण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मच्छिमारांना भीती जपानमधील मच्छिमार समुद्रातील प्राण्यांशी क्रूर वर्तनासाठी कुख्यात आहेत. त्यामुळे त्यांनी खूप कष्टाने आपली प्रतिमा सुधारली असून अजूनही अनेक देश फुकुशिमामधील मासे खरेदी करत नाहीत. त्यातच जपानने हे पाणी समुद्रात सोडल्यास केवळ समुद्री जीवांनाच धोका निर्माण होणार नाही तर या मच्छिमारांना देखील त्यांचा व्यवसाय बंद करावा लागेल. किती घातक आहे रेडिओऍक्टिव पाणी या पाण्यामध्ये युरेनिअम आणि प्लुटोनियमसारखे घातक पदार्थ असतात. त्यामुळे हे पाणी समुद्रात सोडण्याआधी शुद्ध केलं तरीही ते तितकंच घातक असतं. अणू प्रकल्पांमधून तयार होणाऱ्या विजेनंतर हा कचरा तयार होत असतो. या पाण्याच्या संपर्कात व्यक्ती आल्यास काही कालावधीमध्येच व्यक्तीचा मृत्यु होऊ शकतो. तसंच याचा परिणाम उशिराने दिसत असला तरीही रक्ताचा, त्वचेचा आणि हाडांचा कर्करोग यामुळे होऊ शकतो. हजारो वर्षं राहतो प्रभाव   या पाण्याचा मुख्य धोका म्हणजे यामधील रेडिओऍक्टिव्ह घटक काही तासांपासून ते अनेक वर्षांपर्यंत जिवंत असतात. त्यामुळे हा कचरा घातक ठरणार नाही आणि त्यापासून तयार होणारी किरणे बाहेर पडणार नाहीत अशा ठिकाणी गाडला जातो. अजूनपर्यंत सुरु आहे अभ्यास   जपानमधील या अणू कचऱ्यात 226 रेडियम इतके घातक तत्त्व आहे. हे घटक शरीरात प्रवेश करून थेट डीएनएवर हल्ला करतात. यावर वैज्ञानिक अभ्यास करत असून कॅन्सरपेक्षा देखील भयानक परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात. समुद्री जीवांवर देखील परिणाम या घटकांचा परिणाम समुद्री जीवांवरदेखील होतो. या पाण्यामुळे लाखो समुद्री जीवांचा मृत्यू होणार असून जे जिवंत राहतील त्यांच्या शरीरात विषारी घटक आढळून येणार आहेत. भारताला किती धोका जपानने हा कचरा समुद्रात सोडला तर तो प्रशांत महासागरात येणार आहे. त्यामुळे भारताबरोबरच चीन, दक्षिण कोरिया आणि फिलिपिन्सला याचा धोका आहे. जपानने हे पाणी समुद्रात सोडल्यानंतर 14 हजार किलोमीटरचा प्रवास करून  प्रशांत महासागरात येणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव थोडा कमी होणार आहे. परंतु घातक घटक पाण्यात राहणार असल्याने याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या