‘त्या’ जहाजावरील भारतीयांचा जीव धोक्यात, आणखी 4 जणांना झाला 'कोरोना'

‘त्या’ जहाजावरील भारतीयांचा जीव धोक्यात, आणखी 4 जणांना झाला 'कोरोना'

जपानच्या (Japan) डायमंड प्रिन्सेस क्रुझवरील (Dimondi princess cruise) कोरोनाव्हायरस (Coronavirus) भारतीयांची (Indian) संख्या आता 12 झाली आहे.

  • Share this:

टोकियो 23 फेब्रुवारी : जपानच्या (Japan)  क्रुझवरील आणखी 4 भारतीयांना (Indian)  कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. हे चौघंही क्रू मेंबर्स आहेत. COVID-19 च्या निदानासाठी करण्यात आलेल्या चाचणीत या चार भारतीयांचे नमुने पॉझिटिव्ह आलेत. आता जहाजावरील कोरोनाव्हायरसग्रस्त भारतीयांची संख्या आता एकूण 12 झाली आहे.

जपानच्या डायमंड प्रिन्सेस क्रुझवरील (Dimondi princess cruise)  12 भारतीयांना कोरोनाव्हायरस झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, शी माहिती भारतीय दूतावासानं (Indian embassy) रविवारी ट्विटरवर दिली.

हेदेखील वाचा - माझ्या मुलीला वाचवा! भरसमुद्रात अडकली महाराष्ट्राची लेक; PM ना बाबांचं साकडं

जहाजावर अडकलेल्या काही भारतीयांना कोरोनाव्हायरस नसल्याचं निदान चाचणीत झालं आहे. त्यामुळे आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढा अशी मागणी भारतीयांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच या जहाजावर असलेल्या महाराष्ट्रातल्या मुलीनेही व्हिडिओ शेअर केला होता आणि तिने केंद्र सरकारकडे विनंती केली होती.

तर मुलीच्या वडिलांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं आणि माझ्या लेकीला वाचवा तिचा जीव धोक्यात आहे, असं साकडं त्यांना घातलं.

हेदेखील वाचा - अवघ्या 7 महिन्यांच्या जीवाची 'कोरोना'शी टक्कर, दहशतीत ठेवणाऱ्या व्हायरसला हरवलं

या जहाजामधून गेल्या महिन्यात हाँगकाँगमध्ये उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाव्हायरसचं निदान झालं. त्यानंतर योकाहामा बंदरावर 3 फेब्रुवारीपासून हे जहाज अडवून ठेवण्यात आलं आहे, इतर जहाजांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. या जहाजावरील एकूण 3,711 जणांमध्ये 132 क्रू आणि 6 प्रवासी असे एकूण 138 भारतीय आहेत.

जिथून या व्हायरसचा उद्रेक झाला त्या चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या मृतांची संख्या 2,442 झाली आहे तर 76,936 जणांना याची लागण झाली आहे, अशी माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

First published: February 23, 2020, 1:42 PM IST

ताज्या बातम्या