जपानच्या ‘त्या’ जहाजावर भारतीयांचा जीव टांगणीला, तब्बल 14 जणांना 'कोरोना'

जपानच्या ‘त्या’ जहाजावर भारतीयांचा जीव टांगणीला, तब्बल 14 जणांना 'कोरोना'

जपानच्या (Japan) डायमंड प्रिन्सेस क्रुझवरील (Dimondi princess cruise) कोरोनाव्हायरस (Coronavirus) भारतीयांची (Indian) संख्या आता 14 झाली आहे.

  • Share this:

टोकियो 23 फेब्रुवारी : जपानच्या (Japan)  क्रुझवरील आणखी 2 भारतीयांना (Indian)  कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. COVID-19 च्या निदानासाठी करण्यात आलेल्या चाचणीत या दोन भारतीयांचे नमुने पॉझिटिव्ह आलेत. आता जहाजावरील कोरोनाव्हायरसग्रस्त भारतीयांची संख्या आता एकूण 14 झाली आहे.

जपानच्या डायमंड प्रिन्सेस क्रुझवरील (Dimondi princess cruise)  14 भारतीयांना कोरोनाव्हायरस झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती भारतीय दूतावासानं (Indian embassy) सोमवारी ट्विटरवर दिली.

हेदेखील वाचा - 'कोरोना'शी लढताना... भारतातील पहिल्या रुग्णाची व्हायरसवर मात, शेअर केला अनुभव

या जहाजामधून गेल्या महिन्यात हाँगकाँगमध्ये उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाव्हायरसचं निदान झालं. त्यानंतर योकाहामा बंदरावर 3 फेब्रुवारीपासून हे जहाज अडवून ठेवण्यात आलं आहे, इतर जहाजांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. या जहाजावरील एकूण 3,711 जणांमध्ये 132 क्रू आणि 6 प्रवासी असे एकूण 138 भारतीय आहेत. आता काही मोजकेच भारतीय राहिलेत, ज्यांच्या चाचणीचा अहवाल गुरुवार आणि शुक्रवारी येण्याची शक्यता आहे. या अहवालात कोणत्याही भारतीयाला कोरोनाव्हायरस नसावा अशी आशा आहे. असंही भारतीय दूतावासानं म्हटलं आहे.

हेदेखील वाचा - माझ्या मुलीला वाचवा! भरसमुद्रात अडकली महाराष्ट्राची लेक; PM ना बाबांचं साकडं

दरम्यान या जहाजावर असलेल्या भारतीयांनी आम्हाला वाचवा अशी आर्त हाक पंतप्रधान मोदींना घातली. काही दिवसांपूर्वी या जहाजावर असलेल्या महाराष्ट्रातल्या मुलीनेही ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला होता आणि आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढा अशी मागणी केली होती. शिवाय या मुलीच्या वडिलांना पंतप्रधान मोदींना तसं पत्रही लिहिलं होतं.

जिथून या व्हायरसचा उद्रेक झाला त्या चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या मृतांची संख्या 2,600 झाली आहे तर 76000 पेक्षा जास्त जणांना याची लागण झाली आहे, अशी माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

First published: February 24, 2020, 7:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading