मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

VIDEO अमरिकेचा बदला कोण घेणार? सुलेमानिंच्या मुलीचा इराणच्या राष्ट्रपतींना सवाल

VIDEO अमरिकेचा बदला कोण घेणार? सुलेमानिंच्या मुलीचा इराणच्या राष्ट्रपतींना सवाल

Tehran: In this photo released by the official website of the office of the Iranian Presidency, President Hassan Rouhani, second left, meets family of Iranian Revolutionary Guard Gen. Qassem Soleimani, who was killed in the U.S. airstrike in Iraq, at his home in Tehran, Iran, Saturday, Jan. 4, 2020. AP/PTI(AP1_4_2020_000068B)

Tehran: In this photo released by the official website of the office of the Iranian Presidency, President Hassan Rouhani, second left, meets family of Iranian Revolutionary Guard Gen. Qassem Soleimani, who was killed in the U.S. airstrike in Iraq, at his home in Tehran, Iran, Saturday, Jan. 4, 2020. AP/PTI(AP1_4_2020_000068B)

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

तेहरान 06 जानेवारी : इराणच्या कुद्स फोर्सचा प्रमुख कासिम सुलेमानी यांच्या हत्येने इराण हादरून गेलाय. लाखो लोकांच्या उपस्थितीत सुलेमानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनई, राष्ट्रपती हसन रुहानी उपस्थित होते. सुलेमानींना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर आले होते. लोकांनी काळा पेहेराव घातला होता आणि अमेरिकेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती. त्याआधी रुहानी आणि खोमेनई यांनी सुलेमानी यांच्या निवास्थानी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केलं. इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी सैन्य अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातंय.

यावेळी सुलेमानी यांची मुलगी ज़ैनब सुलेमानी हिने राष्ट्रपती हसन रुहानी यांना प्रश्न केला की माझ्या वडिलांच्या हत्येचा बदला कोण घेणार आहे? त्यावर रुहानी म्हणाले, आपण सगळे हा बदला घेऊ. हे दु:ख पचविण्याची अल्लाह तुम्हाला शक्ती देवो असंही ते म्हणाले. आपण सगळे याचा बदला घेऊ त्याची चिंता तुम्ही करू नका असंही त्यांनी आश्वासन दिलं. इराणच्या सरकारी टीव्हीवरून जैनब आणि रुहानी यांची ही चर्चा दाखविण्यात येतेय. याआधीच इराणने अमेरिकेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी दिली आहे.

भिकेचे डोहाळे लागलेल्या पाकनं 170 कोटींच्या टेस्ला कंपनीला दिले निमंत्रण

ट्रम्प यांच्या हत्येसाठी बक्षीस

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत  अमेरिका आणि इराणकडून हल्ले झाले आहेत. इराणने कमांडर सुलेमानी याच्या हत्येचा बदला घेऊ असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनंसुद्धा आता कोणत्याही प्रकारची आगळीक खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. कासिम सुलेमानी याच्यावर अंत्यसंस्कारावेली इराणच्या एका संस्थेनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद कऱणाऱ्यास 80 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 576 कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले आहे.

जनरल सुलेमानी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी इराणच्या या संस्थेनं प्रत्येक नागरीकाने एक डॉलर दान करावे असं आवाहन केलं आहे. ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी बक्षिस ठेवण्यात आलेली रक्कम गोळा करण्यासाठी संस्थेनं म्हटलं की, 'जनरल सुलेमानीचा खूनी ट्रम्पचा शिरच्छेद करणाऱ्यास बक्षिस देण्यासाठी दान द्या.' मसादमध्ये सुलेमानीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले. इराणमधील बहुतांश जनतेच्या मनात अमेरिकेबद्दल संताप आहे.

First published: