Home /News /videsh /

NASA James Webb : जेम्स वेबने शोधली अंतराळातील पर्वत अन् दऱ्या; NASA ने दाखवला आकाशगंगेचा पहिला रंगीत फोटो

NASA James Webb : जेम्स वेबने शोधली अंतराळातील पर्वत अन् दऱ्या; NASA ने दाखवला आकाशगंगेचा पहिला रंगीत फोटो

जगातील सर्वात शक्तीशाली आणि सर्वांत लांब असणाऱ्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या (James Webb) साह्याने आकाशगंगेची घेतलेली रंगीत छायाचित्रे पहिल्यांदाच जगासमोर आणलेली आहे. ही विज्ञान जगतातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे.

    वाॅशिंग्टन, 13 जुलै : अमेरिकेच्या नासाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या (james webb telescope) माध्यमातून आकाशगंगेची घेतलेली रंगीत छायाचित्रे पहिल्यांदाच जगासमोर आणलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी ही छायाचित्रे जारी केली आहेत. यावर नासाने सांगितले की, "आतापर्यंत माणसाला ज्याची जिज्ञासा होती, जी अदृश्य होती, ती आकाशगंगा या छायाचित्रांच्या माध्यमांतून पाहायला मिळाली आहेत. जगातील सर्वात शक्तीशाली आणि सर्वांत लांब असणाऱ्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या साह्याने ही छायाचित्रे घेतली आहेत." (James Webb explored the mountains and valleys in space) वाचा : NASAच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावरून आणलेल्या मातीत वाढवली रोपटी, पुढे काय होणार? नासाने ज्या छायाचित्रांना जगासमोर आणलेले आहे, ती सर्व छायाचित्रे आकाशगंगा क्लस्टर SMACS 0723 याची आहेत. या रंगीत छायाचित्रामध्ये हजारोच्या संख्येने आकाशागंगा असल्याचे दिसते. यासंदर्भात नासाने सांगितले की, "ही छायाचित्रे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी आकाशगंगा क्लस्टर SMACS 0723 कशी होती, हे दाखवतात. त्या आकाशगंगेमागे असंख्य आकाशगंगा आहेत, जी लेन्समुळे दिसतात." नासाची जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप सुरूवातीच्या आकाशगंगाची माहिती करून घेत आहे, ज्यातून संशोधकांना त्याचे वस्तुमान, त्याचे वय, इतिहास आणि त्याची रचनासंदर्भात माहिती मिळू शकेल. जो बायडेन म्हणाले की, "जेम्स वेब टेलिस्कोपच्या माध्यमातून काढलेली छायाचित्रे विज्ञान जगतात ऐतिहासिक आहेत. हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. या छायचित्रांनी दाखवून दिलेले आहे की, अमेरिका खूप मोठ्या गोष्टी करू शकतो आणि अमेरिकेची जनता आपल्या मुलांना सांगते की, आपल्यासाठी कोणतंही काम क्षमतेच्या बाहेर नाही. आपण त्या सर्व शक्यता पाहतो, ज्या आतापर्यंत कुणी पाहिल्या नाहीत. आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो, जिथे आतापर्यंत कुणी पोहोचलेलं नाही." नासाने जेम्स वेब टेलिस्कोपच्या साह्याने इन्फ्रारेड ब्रह्मांडाचे सर्वात जास्त रिज्युलेशन असणाऱी छायाचित्रे काढलेली आहेत. नियर इन्फ्रारेड कॅमेऱ्याच्या साह्याने ही छायाचित्रे घेतलेली आहेत. अगदी छोट्या-छोट्या ताऱ्यांचीदेखील छायाचित्रे घेण्यात आली आहेत, ज्यावर शास्त्रज्ञांचे लक्ष गेलेले नव्हते. जेम्स वेबची ही पहिली रंगीत छायाचित्रे आहे, आकाशगंगेच्या अत्यंत सूक्ष्म बाजू लक्षात येईल, अशी घेण्यात आलेली आहेत. नासाचे अधिकारी बिल नेल्सन म्हणाले की, "या छायाचित्रांमध्ये अंतराळाला एका मुठीत सामावून घेतले आहे. ही अनंत ब्रह्मांडचा एक छोटासा भाग आहे. हे केवळ माणसाने तयार केलेल्या मशीनमुळे शक्य झाले आहे. भविष्यात आपल्याली जी गोष्ट हवी आहे, ते मिळविण्यासाठी ही एक सुरूवात आहे."
    Published by:Arjun Nalavade
    First published:

    Tags: Nasa, Science

    पुढील बातम्या