Home /News /videsh /

Pakistan : 26/11 चा मास्टर माईंड हाफिज सईदला आणखी दोन दहशतवाद प्रकरणात 31 वर्षांचा तुरुंगवास

Pakistan : 26/11 चा मास्टर माईंड हाफिज सईदला आणखी दोन दहशतवाद प्रकरणात 31 वर्षांचा तुरुंगवास

जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद सध्या पाकिस्तानात आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यासाठी लष्कर-ए-तैयबा जबाबदार असल्याचं समोर आलं होतं. या हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह 166 लोक मारले गेले.

  इस्लामाबाद, 8 एप्रिल : जमात-उद-दावा (Jamaat-ud-Dawa) आणि लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) म्होरक्या हाफिज सईद (Hafiz Saeed) याला आणखी दोन दहशतवाद (Terrorism) प्रकरणात 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्यानं हा दावा करण्यात आला आहे. हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तैयबा 2008 च्या मुंबई हल्ल्याला (26/11 Mumbai Attack) जबाबदार असल्याचं समोर आलं होतं. या हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह 166 लोक मारले गेले. संयुक्त राष्ट्रांनी हाफिजला जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. अमेरिकेनं त्याच्यावर 1 कोटी अमेरिकन डॉलर्सचा इनामही जाहीर केला आहे. हाफिज सईदला यापूर्वीच दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याच्या पाच प्रकरणांत (टेरर फंडिंग - terror funding case) 36 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हाफिज सध्या टेरर फंडिंग प्रकरणात कोट लखपत तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं सांगण्यात येत आहे. हे वाचा - डॉक्टर कसले, हे तर हैवान! मरण्यापूर्वीच कैद्यांचे हृदय आणि फुफ्फुसं काढायचे; धक्कादायक माहिती उघड
   फेब्रुवारी 2020 मध्ये झाला होता 11 वर्षे तुरुंगवास
  त्याला 17 जुलै 2019 रोजी दहशतवादी वित्तपुरवठा (terror funding case) प्रकरणात अटक करण्यात आली होती. दहशतवादविरोधी न्यायालयाने त्याला फेब्रुवारी 2020 मध्ये दोन दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा प्रकरणांमध्ये 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. हे वाचा - इम्रान खान यांचे हाल जनरल मुशर्रफ यांच्यासारखे होणार? राजकीय तज्ज्ञ म्हणतात.. नोव्हेंबर 2020 मध्ये 10 वर्षांची शिक्षा झाली मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याला पंजाबमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने नोव्हेंबर 2020 मध्ये दोन दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याच्या प्रकरणात (terror funding case) 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इतकंच नाही तर सईदची संपत्ती जप्त करण्याचे आणि 1.1 लाख रुपयांच्या दंडाचे आदेशही न्यायालयानं दिले होते. या प्रकरणी सईदचे दोन साथीदार जफर इक्बाल आणि याह्या मुजाहिद यांना 10.5 वर्षांची तर अब्दुल रहमान मक्की यांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Pakistan, Pakistanमोहम्मद हाफीज सईद, Terror acttack, Terrorist

  पुढील बातम्या