मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

हॅरी पॉटर फेम जे. के. रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी

हॅरी पॉटर फेम जे. के. रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी

पुढचा नंबर तुमचा... म्हणत, जे. के. रोलिंग यांना जीव मारण्याची धमकी

पुढचा नंबर तुमचा... म्हणत, जे. के. रोलिंग यांना जीव मारण्याची धमकी

पुढचा नंबर तुमचा... म्हणत, जे. के. रोलिंग यांना जीव मारण्याची धमकी

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र आता त्यानंतर हॅरी पॉटर फेम लेखिका जे.के. रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर रोलिंग यांनी शुक्रवारी ट्विटरवर लिहिले, 'भयानक बातमी आहे. मला अस्वस्थ वाटत आहे. खूप आजारी असल्यासारखं वाटत आहे. त्यानंतर त्यांना मीर आसिफ अजीज नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून धमकी देण्यात आली. 'काळजी करू नका, पुढचा नंबर तुमचा आहे अजीजने म्हटलं आहे. Image डेली मेलच्या वृत्तानुसार अजीज हा इराण समर्थित इस्लामिक अतिरेकी असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्याचा आणि रश्दींच्या हल्ल्याचंही कनेक्शन असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर अजीजचे ट्विटर अकाउंट डिलीट करण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. सलमान यांच्यावर हल्ल्याचं कारण काय? The Satanic Verses (1988) या कादंबरीवरून खूप वाद झाले होते. त्यानंतर सलमान रश्दी यांना जीवे मारण्याची धमकीही मिळाली होती. या पुस्तकावर इराणने 1988 मध्ये बंदी घातली होती. त्यामुळे आताच्या हल्ल्याचा याच्याशी संबंध जोडला जात आहे.
First published:

पुढील बातम्या