Home /News /videsh /

Anchorनं Live Show मध्ये बलात्काऱ्याला बोलावून केलं लज्जास्पद कृत्य, टीका झाल्यानंतर मागितली माफी

Anchorनं Live Show मध्ये बलात्काऱ्याला बोलावून केलं लज्जास्पद कृत्य, टीका झाल्यानंतर मागितली माफी

आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट (Ivory Coast) या देशातील एका प्रमुख चॅनेलकडून अशीच एक मोठी घोडचूक झाली आणि त्यांना माफी मागावी लागली.

यामोसुक्रो, 02 सप्टेंबर: चित्रपट, टीव्ही, रेडिओ ही आपल्या जीवनातील अविभाज्य इलेक्टॉनिक माध्यमं आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणाने आम्ही त्यांचा वापर करतोच. मग त्यावर कार्यक्रम सादर करणाऱ्यांनाही आपला प्रेक्षक किती मोठ्या प्रमाणात आहे हे जगाला ओरडून सांगायचं असतं. आमचं टीव्ही चॅनेल सर्वाधिक पाहिलं जातं हे सांगण्यासाठी तर अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. याला साध्या शब्दांमध्ये मांडायचं तर TRP साठी सगळीच चॅनेल आणि न्यूज चॅनेल (News Channels) अजब कार्यक्रम सादर करतात. पण कधीकधी टीआरपीसाठी (TRP) अतिशय बेभान होऊन ते असं काही पाऊल उचलतात की त्यांच्यावर माफी मागायची पाळी येते. आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट (Ivory Coast) या देशातील एका प्रमुख चॅनेलकडून अशीच एक मोठी घोडचूक झाली आणि त्यांना माफी मागावी लागली. या चॅनेलची प्रसिद्ध अँकर यवेस डी मबेलाने लाइव्ह कार्यक्रमात एका बलात्कारी व्यक्तीला बोलवलं आणि त्याला लाइव्ह कार्यक्रमादरम्यान एका पुतळ्यावर बलात्कार (Rape) कसा केला होता हे करून दाखवं असं सांगितलं. त्यानंतर जबरदस्त वाद उसळल्यानंतर चॅनेलनी अँकरला निलंबित केलं. याबाबतचं वृत्त झी न्यूजनं दिलं आहे. मिरर ने दिलेल्या वृत्तानुसार आयव्हर कोस्टमधील एका न्यूज चॅनेलच्या अँकरने आपल्या प्राइम टाइम शोमध्ये एका बलात्कारी व्यक्तीला बोलवलं होतं आणि एका पुतळ्यासोबत बलात्काराचं डमी प्रेझेंटेशन (Dummy Presentation of rape) करायला सांगितलं. या अँकरचं नाव यवेस डी मबेला. मबेला बलात्काराचं वाढतं प्रमाण या विषयाशी संबंधित एक शो होस्ट करते. या लाइव्ह कार्यक्रमात अचानक अँकरने बलात्काऱ्याला (Rapist) डमी पुतळा दिला आणि बलात्कार कसा केला होता ते सगळ्यांना करून दाखवं असं सांगितलं. या बातमीत असं म्हटलं आहे . मबेहा खूप प्रसिद्ध अँकर आहे अशा व्यक्तीने इतकी घाणेरडी कृती करायला सांगितल्यावर लोक संतप्त झाले. सोशल मीडियामध्ये या अँकरवर टीकेची प्रचंड झोड उठली.

तालिबानकडून पाकिस्तानला मोठा झटका, काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार

 या सगळ्या प्रकारानंतर न्यूज चॅनेलने घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली आणि मबेलाला 30 दिवसांसाठी निलंबित केल्याचं जाहीर केलं. आयव्हरी कोस्टच्या माध्यमांशी संबंधित काउन्सिलने (Media Council) एक प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली की, या कार्यक्रमातील एका भागात अश्लिल भाषा वापरण्यात आली आणि महिलांच्या चारित्र्याला धक्का देणाऱ्या गोष्टी केल्या गेल्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी स्वीकारार्ह नाही.
सर्वच माध्यमांतून आणि समाजाच्या सगळ्याच स्तरांतून मबेलावर जोरदार टीका झाल्यावर त्यानेही आपल्या गैरकृत्याबद्दल माफी मागितली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया मेसेजमध्ये (Social Media Message) म्हटलं आहे की समाजात जागृती करण्याच्या नादात माझ्याकडून काही चुका झाल्या त्याबद्दल मला मनापासून खेद वाटत आहे. मी ही मोठी चूक केली आहे आणि मी सर्व बलात्कार पीडितांची माफी मागतो.

लसीलाही न जुमानणाऱ्या कोरोनाच्या Mu व्हेरिएंटनं वाढवली जगाची चिंता, WHO नं दिला गंभीर इशारा

एकूणातच काय टीआरपीच्या नादात न्यूज चॅनेलमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असते. त्यासाठी ते भूता-खेतांवरील कार्यक्रमांपासून घरगुतील भांडणांपर्यंतच्या बातम्या आणि कार्यक्रम दाखवतात. त्यामध्ये अशा घटना घडतात पण अशा घटना घडणार नाहीत याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Tv shows

पुढील बातम्या