Home /News /videsh /

भारतीयांच्या Creativity वर ट्रम्पकन्या फिदा, सायकलवर बसलेला PHOTO केला ट्वीट

भारतीयांच्या Creativity वर ट्रम्पकन्या फिदा, सायकलवर बसलेला PHOTO केला ट्वीट

इव्हांकाच्या फोटोंचे मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते थेट आता इव्हांकापर्यंत पोहोचले असून त्याचं कौतुकही तिने केलं आहे.

    वॉशिंग्टन, 01 मार्च : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवस भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा ट्रम्प यांनी 24 आणि 24 फेब्रुवारी या दोन दिवसांत अहमदाबाद, आग्रा आणि दिल्ली इथं भेट दिली. दरम्यान ट्रम्प यांच्यासह चर्चा झाली ती त्यांची कन्या इव्हांका हिची. इव्हांकाच्या फोटोंचे मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते थेट आता इव्हांकापर्यंत पोहोचले असून त्याचं कौतुकही तिने केलं आहे. इव्हांका ही डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार आहे. तीसुद्धा ट्रम्प यांच्यासोबत या दोन दिवसाच्या दौऱ्यात होती. ट्रम्प यांची पत्नी मेलानिया, इव्हांका आणि तिचा पती हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी काढलेले काही फोटो इव्हांकाने शेअर केले. डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्याआधी आणि ते आल्यानंतरही अनेक मीम्स आणि मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाले. यातच इव्हांका यांच्या मीम्सनी धुमाकूळ घातला. आता हेच मीम्स स्वत: इव्हांकाने शेअर केले आहेत. अमेरिकेत परतल्यानंतर तिने ट्विटरवरून मीम्सचे फोटो ट्वीट केले आहेत. भारतीय लोकांच्या या क्रिएटीव्हीटीचे इव्हांकाने कौतुक केलं आहे. तसेच मी खूप सारे मित्र बनवले असंही ट्विटरवर म्हटलं आहे. बॉलिवू़ड अभिनेता दिलजित दोसांजसोबत मॉर्फ केलेला फोटोही तिनं शेअर केला आहे. हा अनुभव कधीही विसरणार नाही अशी प्रतिक्रिया इव्हांकाने दिली आहे. इव्हांका सामाजिक जीवनात सक्रीय असून ट्रम्प यांच्या सल्लागार म्हणून काम करते. याआधी दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी इव्हांका भारतात आली होती. तेव्हा पंतप्रधान मोदींसोबत काढलेला एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे. संबंधित : मेलानिया ट्रम्प यांची ताजमहाल भेट आणि पांढऱ्या जंपसूटचं भारतीय कनेक्शन संबंधित : जेव्हा प्रभासच्या जागी बाहुबलीत दिसले ट्रम्प, भारत दौऱ्याआधी VIDEO VIRAL
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या