अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्क्यांवर धक्के, आता नातवांना सोडावी लागली शाळा

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्क्यांवर धक्के, आता नातवांना सोडावी लागली शाळा

मुलांना भेटायला येताना इवांका आणि जेरेड यांनी सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन यासारखे नियम त्यांनी पाळले नाही.

  • Share this:

वॉशिंग्टन 15 नोव्हेंबर: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पत्नी मिलेनिया ट्रम्प या त्यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आता ट्रम्प यांच्या तीन नातवांवर वॉशिंग्टनमधली शाळा सोडण्याची वेळ आली आहे. ट्रम्प यांची कन्या इवांका आणि जावई जेरेड कुशनेर (Ivanka Trump and Jared Kushner) यांची ही मुलं आहेत. इवांका आणि जेरेड यांनी कोरोना सुरक्षा नियमांचं वारंवार उल्लंघन केल्याचा ठपका शाळेने ठेवला. त्यामुळे त्यांना आपल्या तीनही मुलांना या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकण्याची वेळ आली आहे.

कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेला त्याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेने काही नियम केले होते. पालकांनाही या नियमाचं पालन करणं सक्तिचं आहे. मात्र मुलांना भेटायला येताना इवांका आणि जेरेड यांनी सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन यासारखे नियम त्यांनी पाळले नाही.

इतर पालकांनी याची तक्रार शाळा व्यवस्थापनाकडे केली होती. त्यानंतर शाळेने त्याची तपासणी केली असता ते नियम पाळत नसल्याचं आढळून आली. त्यानंतर शाळेने त्या दोघांनाही पत्र पाठवून नियम पाळण्यास सांगितलं होतं. मात्र त्या दोघांनीही त्या नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळे शाळेने त्यांना  सक्त ताकिद दिली, त्यामुळे इवांका यांनी मुलांना त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला आहे.

अडीज लाख नागरिकांच्या मृत्यूनंतर US मध्ये कोरोनाचा कहर अधिक वाढला

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प एकीकडे अध्यक्षपद मगावल्यामुळे चर्चेत आले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चादेखील होऊ लागल्या आहेत. मेलेनिया डोनाल्ड ट्रम्प यांना खरोखरच घटस्फोट देणार की या फक्त चर्चाच आहेत हे काही दिवसांत समजलेच मात्र मेलेनिया ट्रम्प यांचं स्वत: असं एक अस्थित्व आहे. फक्त मिसेस ट्रम्प म्हणून त्या ओळखल्या जात नाहीत.

मेलेनिया ट्रम्प या दुसऱ्या देशातील महिला असूनही त्यांना अमेरिकेची फर्स्ट लेडी होण्याचा बहुमान मिळाला. अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत दुसऱ्यांदाच अशी घटना घडली आहे. मेलेनिया ट्रम्प यांचा जन्म स्लोवेनियामध्ये 1970 साली झाला आहे. 1991 मध्ये जेव्हा कम्युनिस्टांच्या राज्याचं पतन झालं होतं तेव्हा युगोस्लविया स्लोवेनियापासून वेगळं झालं होतं. जवळजवळ 20 लाख लोकांना स्वातंत्र मिळालं होतं. त्यातल्या काही लोकांनी अमेरिका तर काहींनी युरोपमध्ये पलायन केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 15, 2020, 9:08 PM IST

ताज्या बातम्या