10 महिने कोमामध्ये होती महिला, बाहेर आल्यानंतर झाली होती एका मुलीची आई

एक महिला जवळपास वर्षभर कोमात (Coma) होती. कोमातून बाहेर येताच ती आई झाल्याचं तिला समजलं कारण जेव्हा ती कोमात गेली होती तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती. आपण आई झाल्याची बातमी ऐकून तिला सुखद धक्का बसला.

एक महिला जवळपास वर्षभर कोमात (Coma) होती. कोमातून बाहेर येताच ती आई झाल्याचं तिला समजलं कारण जेव्हा ती कोमात गेली होती तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती. आपण आई झाल्याची बातमी ऐकून तिला सुखद धक्का बसला.

  • Share this:
रोम, इटली, 15 जून : कोणत्याही कुटुंबासाठी वैद्यकिय आपत्ती (Medical Crisis) हे वाईट स्वप्न असतं. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मानसिक आणि अर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यातही रुग्ण बचावला तर ठिक नाही, तर होणारं दुःख अधिक वेदना देऊन जातं. इटलीतील एक घटना मात्र जराशी निराळी आहे. येथील एक महिला जवळपास वर्षभर कोमात (Coma) होती. कोमातून बाहेर येताच ती आई झाल्याचं तिला समजलं कारण जेव्हा ती कोमात गेली होती तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती. आपण आई झाल्याची बातमी ऐकून तिला सुखद धक्का बसला. सध्या तिची प्रकृती सुधारत असून तिच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे. इटलीतील एक महिला जवळपास 1 वर्ष हार्ट अटॅक (Heart Attack) मुळे कोमात होती. 10 महिन्यांनंतर जेव्हा ती कोमातून बाहेर आली, तेव्हा एका बाळाची आई (Italy Women in Coma Given Birth to Child) झाल्याचं तिला समजलं. हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली. एवढा काळ कोमामध्ये असल्याने तिला ही बाब स्वीकारण्यासाठी वेळ लागला. परंतु, तिच्यासाठी हा सुखद धक्का होता. ही घटना इटलीमध्ये घडली असून, त्या महिलेचं नाव क्रिस्टीना रोजी (Cristina Rosi) आहे. क्रिस्टीनाचं वय 37 वर्षे आहे. क्रिस्टीनाला जुलै 2020 मध्ये हार्ट अटॅक आला. अटॅक आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर ती कोमात गेली. तिचे कुटुंबीय या घटनेमुळे चिंतेत होते. मात्र कोमातून बाहेर आल्यानंतर सर्वप्रथम तिने तिच्या आईची आठवण काढली.

(वाचा - कोरोना लस घ्या आणि 10 लाखांची कार मोफत मिळवा; याठिकाणी मिळतेय अनोखी ऑफर)

कोमातून बाहेर येताच बनली आई - जेव्हा क्रिस्टीना रोजीला हार्ट अटॅक आला, तेव्हा ती 7 महिन्यांची गर्भवती (Pregnant) होती. मिरर वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, तिची डिलिव्हरी कोमादरम्यान सिझेरिअनच्या माध्यमातून करण्यात आली. तिच्या मुलीची प्रकृती उत्तम असून, तिचं नाव कटरिना (Caterina) ठेवण्यात आलं आहे. क्रिस्टीना जेव्हा शुध्दीवर आली, तेव्हा तु एका बाळाला जन्म दिला आहेस असं तिला सांगण्यात आलं. हे ऐकताच ती आश्चर्यचकित आणि आनंदी झाली. सध्या तिची प्रकृती वेगात सुधारत असून, ती आता आहार देखील घेत आहे.

(वाचा - हनीमूनला जाताच पतीचं सत्य आलं समोर, आता पत्नीचे कपडे अन् दागिने घालून बनणार नवरी)

पहिला शब्द उच्चारला `मम्मा` - ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे क्रिस्टीना कोमात गेली होती. ती जेव्हा कोमातून बाहेर आली तेव्हा मी तिथे उपस्थित होतो, असं तिच्या पतीनं सांगितलं. क्रिस्टीना शुध्दीवर आली तेव्हा तिने सर्वप्रथम तिच्या आईची आठवण काढली आणि तिने पहिला शब्द उच्चारला `मम्मा`. क्रिस्टीनाच्या आईला जेव्हा ही बाब समजली तेव्हा माझ्या मुलीचा पुर्नजन्म झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अनेक महिने क्रिस्टीना रुग्णालयात अडमिट असल्याने तिच्या उपचार आणि मदतीसाठी क्राऊड फंडींगच्या माध्यमातून 208,000 डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली. आता क्रिस्टीनाची प्रकृती सुधारत असल्यानं तिचे कुटुंबिय समाधानी आहेत.
Published by:Karishma Bhurke
First published: