इटलीत आज एकाच दिवशी 651 जणांचा मृत्यू, एकूण संख्या 5,500वर

इटलीत आज एकाच दिवशी 651 जणांचा मृत्यू, एकूण संख्या 5,500वर

मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

व्हेनिस 22 मार्च : चीननंतर कोरोनाने इटलीत सगळ्यात जास्त धुमाकूळ घातला आहे. दररोज मृत्यूची संख्या वाढतच आहे. आज एकाच दिवसात तब्बल 651 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या साडपाच हजारांवर गेली आहे. यात हॉस्पिटल्समध्ये सेवा करणाऱ्यांची सख्या मोठी आहे. त्यात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व जगात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढतोय. तर मृत्यू पडणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. कोरोनाने अख्ख जगच व्यापलं आहे. महाकाय चीनपासून ते बलाढ्य अमेरिकेपर्यंत सर्वच देश कोरोनाने ग्रासले आहेत. कोरोनामुळे बाधित असलेल्यांची रविवारी 4 वाजेपर्यंतची संख्या 3 लाख 7 हजार 341 असल्याची माहिती जगविख्यात Johns Hopkins University ने दिली आहे. तर मृत्यूने 13 हजारांचा आकडा पार केलाय. चीन, इटली, अमेरिका, स्पेन आणि जर्मनी हे कोरोनाग्रस्त 5 टॉप टेन देश आहेत.

कोरोनाची दहशत, संशयातून गर्भवती महिलेला मारहाण; जीवेमारण्याचा केला प्रयत्न

अशी आहे आकडेवारी

81,393 China

53,578 Italy

26,747 US

25,496 Spain

22,364 Germany

पाकने रुग्णांना दिली अशी वागणूक की भारतीयांचेही डोळे पाणावले

ब्रिटनमध्ये 5000 पेक्षा जास्त प्रकरणं समोर आलीत, तर 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहता ब्रिटन सरकारने काही विशेष अशा 15 लाख लोकांना 3 महिन्यांपर्यंत घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.  या 15 लाख नागरिकांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांना हाडांचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, सिस्टिक फायब्रोसिससारखे गंभीर आजार आहेत आणि ज्यांनी नुकतंच अवयव प्रत्यारोपण करून घेतलेलं आहे.

कम्युनिटी सेक्रेटरी रॉबर्ट जेनरिक यांनी सांगितल की, अशा लोकांनी घरात राहायला हवं, जेणेकरून वैद्यकीय सेवेवर भार येणार नाही आणि अनेकांचा जीव वाचेल.

Tags: italy
First Published: Mar 22, 2020 11:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading