Elec-widget

जीसॅट-9 उपग्रहाचे आज प्रक्षेपण, पाकिस्तान वगळता 'सार्क' देशांचा समावेश

जीसॅट-9 उपग्रहाचे आज प्रक्षेपण, पाकिस्तान वगळता 'सार्क' देशांचा समावेश

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी 'जीसॅट-9' हा उपग्रह अवकाशात झेपावेल.

  • Share this:

05 मे : दक्षिण आशियाई उपग्रह जीसॅट 9 च्या प्रक्षेपणाचं काऊण्टडाऊन अंतिम टप्प्यात आलं आहे. इस्रो आज 11 व्या मोहिमेचं प्रक्षेपण होणार आहे. हा उपग्रह शांतीसंदेश घेऊन जाणार आहे. विशेष म्हणजे, या उपग्रहातून मिळालेला डेटा अर्थात माहिती भारत पाक वगळता 'सार्क'मधील उर्वरित 6 देशांबरोबर भारत शेअर करणार आहे. देशांतर्गत संदेशवहनाचे जाळे अधिकाधिक घट्ट करण्यात जीसॅट महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून  आज संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी 'जीसॅट-9' हा उपग्रह अवकाशात झेपावेल. यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून काल दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी काऊंटडाऊनला सुरुवात झाली असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

दक्षिण आशियातील भारताच्या शेजारी देशांसाठी ‘अमूल्य भेट’ असणाऱ्या जीसॅट-9 मध्ये उच्च दर्जाचे क्रायजॅनिक इंजिन असेल. या दक्षिण आशिया उपग्रहाचं प्रक्षेपण करणाऱ्या रॉकेटचं वजन 412 टन तर लांबी 50 मीटर आहे. या उपग्रहाचं वजन 2,230 कि. ग्रॅ. असून तो बनवण्यासाठी इस्रोला ३ वर्षं लागली. तर जीसॅट-९ च्या निर्मितीसाठी २३५ कोटींचा खर्च आला आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीचं मॅपिंग करणं, शैक्षणिक संस्था कुठे उभारता येतील हे सुचवणं, अशा अनेक गोष्टी हा उपग्रह पाठवणार आहे. दक्षिण आशियातील सात देश जीसॅट-९ उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये पाकिस्तान वगळता भारतासह श्रीलंका, भूटान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि मालदिवचा समावेश आहे. त्यामुळे पाक वगळता दक्षिण आशियातील इतर सर्व देशांना या मोहिमेचा फायदाच होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com