मराठी बातम्या /बातम्या /विदेश /इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंची लव्हस्टोरी, लग्न आणि बरंच काही..; सार्वजनिकरित्या मागावी लागली होती माफी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंची लव्हस्टोरी, लग्न आणि बरंच काही..; सार्वजनिकरित्या मागावी लागली होती माफी

नेतन्याहू यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहीलं. त्यांचे अफेयर्स, तीन लग्न, सेक्स व्हिडिओ आणि बरंच काही.

नेतन्याहू यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहीलं. त्यांचे अफेयर्स, तीन लग्न, सेक्स व्हिडिओ आणि बरंच काही.

नेतन्याहू यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहीलं. त्यांचे अफेयर्स, तीन लग्न, सेक्स व्हिडिओ आणि बरंच काही.

इस्त्रायल, 4 जून: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) यांना पद सोडावं लागणार आहे. त्यांच्या जागी नव्या सरकारमध्ये नफ्ताली बेनेट पंतप्रधान होतील. नेतन्याहू यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संमिश्र राहिला. बऱ्यादचा ते वादातही अडकले मात्र, नेतन्याहू यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहीलं. त्यांचे अफेयर्स, तीन लग्न, सेक्स व्हिडिओ आणि बरंच काही. या सेक्स व्हिडिओ टेपसाठी त्यांना सार्वजनिकरित्या माफी मागावी लागली होती. नेतन्याहू यांचं पहिलं लग्न तुटण्याचा किस्सा सर्वात जास्त चर्चेत राहीला होता.

"द टाइम्स ऑफ इस्रायल"च्या एका रिपोर्टनुसार नेतन्याहूंचे काही काही सिक्रेट समोर आल्यास त्यांचं खूप मोठं नुकसान होईल. त्यांचं वैयक्तिक आयुष्य दोन अयशस्वी विवाह आणि एका एअरहॉस्टेससोबत लग्न तसेच फसवणुकीशी संबंधित आहे. असं असलं तरी नेतन्याहू हे इस्रायलचे असे पंतप्रधान आहेत ज्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी अनिवार्य लष्करी करीअरमध्ये कमांडो बनणं पसंत केलं. त्यांनी अनेक साहसी मोहिमांमध्ये भाग घेतला. त्यापैकीच एक "ऑपरेशन गिफ्ट". ते बेरूत विमानतळावर इस्रायली नागरिकांना सोडवण्यासाठी गेलेल्या कमांडो टीमचे सदस्य होते. नेतन्याहू खूप सुंदर आणि आकर्षक दिसायचे त्यामुळे ते अनेक मुलींना आवडायचे.

नेतन्याहूंचं पहिलं प्रेम -

मरियम वीजमन ही नेतन्याहू यांची पहिली पत्नी. नेतन्याहू लष्करात असताना दोघं प्रेमात पडले. त्यावेळी मरियमदेखील सैन्यात ट्रेनिंग घेत होत्या. दोघंही जवळच राहायचे. काही वेळा भेटल्यांनंतर दोघं प्रेमात पडले आणि सैन्याचं प्रशिक्षण संपल्यानंतर दोघंही उच्च शिक्षण घेण्यासाठी 1972मध्ये अमेरिकेला निघून गेले. अमेरिकेत मरियमने ब्रँडिजमध्ये ग्रॅज्यूएशनसाठी अॅडमिशन घेतलं. तर नेतन्याहू शिक्षणासाठी कॉर्नेलला गेले. त्यानंतर त्यांनी एमआयटीत प्रवेश घेतला. त्यावेळी ते 23 वर्षांचे होते आणि मरियमही सारख्याच वयाच्या होत्या. दोघंही सोबत छान दिसायचे.

मरियमला एकटं वाटायचं म्हणून नेतन्याहूंनी एमआयटीत अॅडमिशन घेतलं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. 1978मध्ये मरियम प्रग्नेंट झाल्या. घरात आनंदाचं वातावरण होतं. याच दरम्यान, एमआयटीच्या लायब्ररीत एका ब्रिटिश मुलीशी त्यांची भेट झाली. तिचं नाव फेलर केटेस. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि जवळीकही. त्यांचं घरात कमी असणं हे पत्नी मरियमलाही जाणवलं आणि एकेदिवशी मरियमला दोघांविषयी कळलं. मरियमनी स्वतः नेतन्याहू आणि फेलरला हातात हात घालून फिरताना पाहिलं. त्यानंतर जोरदार भांडण झालं आणि मरियम घर सोडून निघून गेल्या.   नंतर, एप्रिल 1978मध्ये मरियमने हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. तिचं नाव नोआ. नेतन्याहू यांनी फुलांचा गुलदस्ता मरियमसाठी पाठवला मात्र ते मुलीला पाहायलाही गेले नाहीत.

नेतन्याहूंचं दुसरं लग्न -  

नेतन्याहूंनी ब्रिटिश तरुणी फेलरसोबत 1981मध्ये दुसरं लग्न केलं. मात्र, तेही टिकलं नाही. फेलर यहुदी नसल्यानं नेतन्याहूंचे आई-वडील त्यांच्या या लग्नाने खूश नव्हते.

खासदार ते पंतप्रधानपद -

हे ही वाचा-'या' देशाचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायल अमेरिकेशीही संघर्ष करण्यास तयार

लग्नानंतर तीन वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, नेतन्याहूंची प्रगती सुरूच होती. 1984मध्ये संयुक्त राष्ट्रात इस्रायलच्या स्थायी प्रतिनिधीपदी त्यांची निवड झाली. त्यानंतरच्या सहा वर्षात त्यांनी राजकीयदृष्या स्वतःच स्थान निर्माण केलं. 1992 मध्ये नेतन्याहू लिकुड पार्टीतर्फे खासदार झाले. त्यांना संसदेत लिकुड पक्षाचा नेता बनवलं गेलं. 1996च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाला शानदार विजय मिळवून दिला आणि पंतप्रधान झाले.

दरम्यान, दुसरं लग्न मोडल्यानंतर ते 7 वर्ष एकटे राहीले. बऱ्याच महिलांसोबत त्यांचं नावं जोडलं गेलं. अशातच 1991मध्ये त्यांनी तिसरं लग्न केलं. त्यांचं हे लग्न चांगलंच चर्चेत राहिलं होतं.

नेतन्याहू यांचं तिसरं लग्न -  

नेतन्याहू यांची तिसरी पत्नी सारा बेन आर्जी. सारा इस्रायलमधील ईएलएएलमध्ये (El Al) एयरहोस्टेस होती. दोघांच्या पहिल्या भेटीबाबत इस्रायलच्या माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. असं म्हटलं जातं की, सारा प्रेग्नेंट झाल्यानं नेतन्याहूंना हे लग्न करावं लागलं होतं.

सारा आणि नेतन्याहू यांना दोन मुलं आहेत. मात्र, सर्वात जास्त चर्चा असते ती सारा यांची. त्यांचं नाव अनेक घोटाळ्यांमध्ये आणि भ्रष्टाचारात आलंय. तसेच त्यांच्या मुलांची देखरेख करण्याऱ्या काही केअरटेकरनी साराच्या वाईट वर्तनामुळे त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत.

हे ही वाचा-आता व्हिएतनाममध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला, हवेतून वेगात होतोय संसर्ग

नेतन्याहूंचा सेक्स व्हिडिओ आणि त्याचे परिणाम –

एकेदिवशी साराला एका महिलेचा फोन आला आणि नेतन्याहूंसोबत तिचे संबंध असल्याचं तिने सांगितलं. तसेच दोघांचांही एक सेक्स व्हिडिओ तिच्याजवळ असल्याचं सांगितलं. त्यामुळे नेतन्याहू अडचणीत सापडले होते. घरी तर भांडणं सुरूच होती, मात्र, त्यांना सर्वाधिक भीती होती ती त्यांच्या राजकीय स्थानाची. तेव्हाची परिस्थिती पाहता नेतन्याहूंनी एक बोल्ड पर्याय निवडला. तो होता माफीचा.

..आणि नेतन्याहूंनी मागितली माफी -

या प्रकरणानंतर नेतन्याहू यांनी पत्रकार परिषद बोलवली. सोबत पत्नी सारादेखील होत्या. हा व्हिडिओ एका राजकीय कटाचा भाग असून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी रचला गेल्याचं नेतन्याहूंनी सांगितलं. ‘मी असा नाही, तसेच अशी चूक पुन्हा होणार नाही, त्यामुळे मला माफ करा’ असं म्हणत त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली. मात्र, याचा परिणाम म्हणजे नेतन्याहू निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा ते निवडून आले आणि पंतप्रधानपदी विराजमान झाले. नेतन्याहू यांची इस्त्रायच्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तीशाली पंतप्रधानांमध्ये गणना होते. गेल्या काही वर्षात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप लागले असून त्याचा तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Israel