इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च (IIBR) हे एक गुप्त युनिट आहे जे थेट इस्रायलच्या पंतप्रधानांच्या देखरेखीखाली कार्य करते. ही लस अॅंटीबॉयटिक्स विकसित करते जी कोरोनाव्हायरसवर मात देण्यासाठी उपयोगी असतील. इस्रायलचा असा दावा आहे की ते लवकरच आपल्या तंत्रज्ञानाने कोरोनाला पराभूत करतील. त्याचबरोबर इस्रायल आणि भारत एकत्रितपणे कोव्हिड-19 चा पराभव करण्याचा मार्ग सापडेल अशी भारताला आशा आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारत इस्रायलकडून तंत्रज्ञान घेईल. याआधी तयार केले स्वस्त व्हेंटिलेटर याआधी इस्त्रायली कंपनीने स्वस्त व्हेंटिलेटरही तयार केले होते. स्पिकिंग व्हेंटिलेटर देखील तयार केले गेले आहे. याच्या मदतीनं इस्रायल दररोज 10 हजार चाचण्या करत आहे. अॅपच्या माध्यमातून दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना चाचणीशीही जोडले गेले आहे. इस्त्रायली मॉडेलचे खूप कौतुक केले जाते. याआधी अमेरिका आणि ब्रिटन हे देशही कोरोना लस तयार करण्यात सक्रीय आहेत.#BREAKING: Joint statement by the Israeli Ministery of Defense and the Israel Institute for Biological Research: A significant breakthrough has been achieved in finding an antidote to the Corona virus that attacks the virus and can neutralize it in the sick body
— Amichai Stein (@AmichaiStein1) May 4, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona