जेरुसलेम, 24 मे : इस्रायलमध्ये (Israel) गेल्या दशकातील सर्वात भीषण दंगे (riots) यावर्षी झाले आहेत. अरब आणि ज्यू नागरिकांमध्ये झालेल्या या संघर्षात (Israel-Palestine Clash) वाहनं, हॉटेल तसेच अन्य मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दंगलीनंतरही मानवतेचं एक श्रेष्ठ उदाहरण पाहयला मिळाले आहे. या दंगलीत मृत पावलेल्या एका ज्यू नागरिकाची किडनी एका अरब महिलेला देण्यात आली. त्यामुळे तिला एकप्रकारे जीवदान मिळाले आहे.
'हारेत्ज' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एका इस्रायली-अरब महिलेला मागच्या आठवड्यात किडनी प्रत्यारोपन करण्यात आले. तिला ही किडनी शहरातील दंगलीत मारल्या गेल्या एका ज्यू पुरुषाने दान केली आहे. यामधील वृत्तानुसार रँडा एवैस असे या महिलेचे नाव असून त्या 58 वर्षांच्या आहेत. त्यांनी सात वर्षांपूर्वीच किडनी प्रत्यारोपणासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांना या कालावधीमध्ये कुणीही दाता मिळाला नव्हता. मागच्या आठवड्यात झालेल्या दंगलीमध्ये मारले गेलेल्या यिगाल येहोशुआ यांच्या किडनीमुळे त्यांची खूप मोठी समस्या दूर झाली आहे.
येहाशुआच्या भावाने 'फॉक्स न्यूज' शी बोलताना सांगितले की, "त्याचा परोपकारावर विश्वास होता. त्याचे मन मोठे होते. त्यामुळेच आम्ही त्याचे शरीर दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या महिलेला नवं आयुष्य मिळणार आहे." तर ऐवैस यांनी सीएएनशी बोलताना त्यांना मिळालेल्या किडनीबद्दल आभार व्यक्त केले आहेत. "त्या व्यक्तीने कुणाचे काय नुकसान केले होते? त्याला का मारण्यात आले? आता त्याची पत्नी आणि मुलं कसं जगतील?'' अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनासाठी चीनच जबाबदार! हाती लागले पुरावे, अमेरिकेनं केला खळबळजनक दावा
इस्रायलमधील लोड शहराला दंगलीचा सर्वात जास्त फटका बसला आहे. ही दंगल सुरु झाल्यानंतर इस्रायल सरकारने शहरात आणिबाणीची घोषणा केली असून रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Israel, World news