• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • इस्रायलच्या चंद्रमोहिमेतही आले होते अडथळे, काय घडलं अखेरच्या क्षणी?

इस्रायलच्या चंद्रमोहिमेतही आले होते अडथळे, काय घडलं अखेरच्या क्षणी?

भारताच्या चांद्रयान -2 प्रमाणेच इस्रायलच्या चांद्रमोहिमेतही अखेरच्या क्षणी अडथळे आले होते. इस्रायलचं चांद्रयान अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळलं होतं. या यानाला अपघात झाला होता.

 • Share this:
  मुंबई, 7 सप्टेंबर : भारताच्या चांद्रयान -2 प्रमाणेच इस्रायलच्या चांद्रमोहिमेतही अखेरच्या क्षणी अडथळे आले होते. इस्रायलचं चांद्रयान अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळलं होतं. या यानाला अपघात झाला होता. इस्रायलचं हे यान याच वर्षी 11 एप्रिलला चंद्रावर उतरणार होतं. लँडिंगच्या आधी काही क्षण इंजिनचं काम बंद पडलं. हे इंजिन सुरू करण्याचा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला पण मग त्यांचा लँडरशी संपर्क तुटला. इस्रायलच्या स्पेस एजन्सीने याबद्दल ट्वीट केलं आणि लँडर चंद्रावर लँड करताना अपघात झाल्याचं जाहीर केलं. इस्रायलच्या चंद्रमोहिमेचे मुख्य मॉरिस कन यांनी सांगितलं,'आम्ही यशस्वी झालो नाही पण प्रयत्न जरूर केले. आम्हाला याचा अभिमान आहे.' इस्रायलची ही चांद्रमोहीम अपयशी झाल्यानंतर भारतीय वैज्ञानिकांनी यातून धडा घेतला आणि चांद्रयान -2 मोहीम पुढे ढकलली. अमेरिकेचं यान 1972 मध्ये चंद्रावर जिथे उतरलं त्याच ठिकाणी इस्रायलला यान उतरवायचं होतं. अमेरिकेच्या अपोलो -17 यानातून अमेरिकेचे अंतराळवीर यशस्वीपणे चंद्रावर उतरले होते. काँग्रेस नेत्यानं इस्त्रो शास्त्रज्ञांची उडवली खिल्ली, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल इस्रायलच्या वैज्ञानिकांनीही अशीच त्यांची सगळी ताकद पणाला लावली होती. या यानामध्ये लावलेले कॅमेरे चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो पृथ्वीवर पाठवणार होते. पण लँडरलाच अपघात झाल्यामुळे मोहीम अपूर्ण राहिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन न्येतानाहू त्यावेळी म्हणाले होते, जर आपण पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालो नाही तर दुसऱ्यांदा पुन्हा प्रयत्न केले पाहिजे. भारताच्या चांद्रयान -2 मोहिमेत विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर सगळ्यांनाच इस्रायलच्या चांद्रमोहिमेची आठवण झाली. यामुळेच चांद्रयान -2 मोहिमेची शेवटची 15 मिनिटं कसोटीची असणार आहेत याचं भान शास्त्रज्ञांना होतं. VIDEO : असा आहे 'मेक इन इंडिया'अंतर्गत बनवलेला मेट्रोचा पहिला कोच ======================================================================================================

  चंद्रयान मोहिमेचं कवी कसं वर्णन करतील, पाहा UNCUT पंतप्रधान मोदींचं भाषण

  <iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-405448" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDA1NDQ4/"></iframe>
  Published by:Arti Kulkarni
  First published: