मुंबई, 19 मे : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल (Israel)आणि पॅलेस्टाईन (Palestine)यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. काही काळापूर्वी माजी पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa)हिनं पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्यानं ती चर्चेत आली होती. आता आणखी एका सुपर मॉडेलच्या विधानामुळे इस्रायल संतप्त झाला आहे. या सुपरमॉडेलच्या पोस्टवर इस्रायलनं तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तिला यहुदी लोकांचा विनाश व्हावा अशी इच्छा असल्याचा आरोप इस्रायलनं केला आहे. ही सुपरमॉडेल आहे बेला हदीद (Bella Hadid). बेला हदीद आणि तिची बहिण गीगी हदीद(Gigi Hadid) दोघीही सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर नेहमी सक्रीय असतात.
बेला हदीद हिनं नुकतीच इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षावर एक पोस्ट शेअर केली आहे. या विषयावर आपल्याला काहीतरी सांगायचे आहे; पण त्याआधी त्याबाबत अभ्यासपूर्ण माहिती देणं आवश्यक आहे, असं तिनं म्हटलं आहे. कोणत्याही धर्माबद्दल नाही, तर इस्रायलचा वसाहतवाद, लष्करी सामर्थ्याचा वापर आणि पॅलेस्टाईनमधील नागरिकांचा जात आणि रंगभेदावरून केला जाणारा नरसंहार याबद्दल मला बोलयाचे आहे. आम्ही पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहोत, असं तिनं म्हटलं आहे. बेला सातत्यानं पॅलेस्टाईनचं समर्थन करत असल्याबद्दल इस्रायलनं नाराजी व्यक्त केली असून, एक ट्विट करून बेला हदीदवर टीका केली आहे.
When celebrities like @BellaHadid advocate for throwing Jews into the sea, they are advocating for the elimination of the Jewish State. This shouldn't be an Israeli-Palestinian issue. This should be a human issue. Shame on you.#IsraelUnderAttack pic.twitter.com/PJQHT90cNy
— Israel ישראל (@Israel) May 16, 2021
बेला हदीदसारख्या सुपरमॉडेल्स यहुदीनां म्हणजेच ज्यूंना (Jew)समुद्रात फेकण्याची भाषा करत असतील तर त्या इस्रायल नष्ट होण्याची वाट बघत आहेत, हे स्पष्ट दिसतं, असं इस्रायलनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षावर पोस्ट करण्यापेक्षा मानवतेच्या (Human) दृष्टीकोनातून मत मांडणे गरजेचे होते. बेला हदीद हिला आपल्या अशा विचारांबद्दल लाज वाटली पाहिजे असे खडे बोलही इस्रायलनं सुनावले आहेत. बेला हदीद लाईव्ह स्ट्रीम (Live Stream) करतानाचा एक स्क्रीन शॉटदेखील इस्रायलनं शेअर केला आहे. ‘नद्यांपासून ते समुद्रापर्यंत पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल’ अशा घोषणा देणारे लोक इस्रायलच्या विनाशाची इच्छा करतात, असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बेला आणि तिची बहिण गीगी ह्दीद या अर्ध्या डच आणि अर्ध्या पॅलेस्टाईन वंशाच्या असून, दोघींचाही जन्म अमेरिकेत(USA)झाला आहे. दोघीही पॅलेस्टाईनचं समर्थन करतात. अमेरिका इस्रायलला मदत करत असल्यानं इस्रायल सतत पॅलेस्टाईनवर हल्ला करत असल्याचंही बेलानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Israel