मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लष्कराच्या अकाउंटवर हॉट फोटोने खळबळ, इस्रायलने केला उलगडा

लष्कराच्या अकाउंटवर हॉट फोटोने खळबळ, इस्रायलने केला उलगडा

 इस्रायलने म्हटलं की, दहशतवादी संघटना हमासने सैनिकांना निशाणा बनवण्यासाठी तरुणींच्या हॉट फोटोंचा वापर केला.

इस्रायलने म्हटलं की, दहशतवादी संघटना हमासने सैनिकांना निशाणा बनवण्यासाठी तरुणींच्या हॉट फोटोंचा वापर केला.

इस्रायलने म्हटलं की, दहशतवादी संघटना हमासने सैनिकांना निशाणा बनवण्यासाठी तरुणींच्या हॉट फोटोंचा वापर केला.

  • Published by:  Suraj Yadav
येरुसलेम, 16 फेब्रुवारी : युद्ध लढायचं म्हटलं की सैनिक, तोफा, दारुगोळा, शस्त्रास्त्रे इत्यादींचा वापर केला जातो. मात्र त्याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत ज्याच्या आधारे शत्रूला निशाणा बनवलं जातं. इस्रायल लष्कराच्या अधिकृत ट्विटरवरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर इस्रायलने त्यांच्या सैनिकांना टार्गेट केलं जात असल्याचा दावा केला आहे. इस्रायलने म्हटलं की, दहशतवादी संघटना हमासने सैनिकांना निशाणा बनवण्यासाठी तरुणींच्या हॉट फोटोंचा वापर केला. हमासचे हॅकर्स सोशल मीडियावर महिलांच्या नावाने अकाउंट काढायचे. त्यावरून सुंदर आणि हॉट तरुणींचे फोटो पाठवून सैनिकांना अडकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा प्रयत्न असायचा की, सैनिकांनी मैत्री करताच मालवेअर डाउनलोड करायला लावायचा. त्याच्याआधारे फोन हॅक करता येतो. इस्रायलचे कर्नल जोनाथन कॉर्निकस यांनी म्हटलं की, गेस्या काही महिन्यांपासून सैनिकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. पण हमासला कोणतीच गुप्त माहिती मिळू शकली नाही. इस्रायल लष्कराच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून तरुणीचा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यांना ट्रोल केलं गेलं. पण इस्रायलच्या सैन्याकडून देण्यात आलेल्या प्रतिक्रियेवरून अकाउंट हॅक झाल्याचे संकेत मिळतात. लष्करतील सैनिकांना किंवा अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी महिलांचा वापर केला जातो. सैनिकांना त्या प्रवासी असल्याचं किंवा मुकबधीर असल्याचं सांगतात. यामुळे फोनवर बोलणं किंवा संपर्क करणं टाळता येतं. त्यामुळे ओळख समोर येत नाही. त्यानंतर सैनिकांना स्नॅपचॅटसारखी लिंक पाठवून त्यावरून फोटो, व्हिडिओ पाठवता येतात असं सांगितलं जातं. त्यात मालवेअर लिंक असतात. अशा मालवेअरवर क्लिक करताच फोन हॅक होतो आणि हॅकर्सना माहिती चोरणं सोपं होतं. VIDEO : खरं प्रेम! दोघांनीही कोरोना, सलाइन लावलेल्या अवस्थेतही पत्नीला भरवले घास
First published:

पुढील बातम्या