मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

इस्रायलकडून पुन्हा हमासवर Air Strike, बलून हल्ल्यांना दिलं प्रत्युत्तर

इस्रायलकडून पुन्हा हमासवर Air Strike, बलून हल्ल्यांना दिलं प्रत्युत्तर

इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील वाद शमण्याचं नाव घेत नसून इस्रायलनं आता पुन्हा एकदा हमासवर जोरदार हल्ला (Air Strike) केला आहे.

इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील वाद शमण्याचं नाव घेत नसून इस्रायलनं आता पुन्हा एकदा हमासवर जोरदार हल्ला (Air Strike) केला आहे.

इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील वाद शमण्याचं नाव घेत नसून इस्रायलनं आता पुन्हा एकदा हमासवर जोरदार हल्ला (Air Strike) केला आहे.

  • Published by:  desk news

जेरुसलेम, 7 सप्टेंबर : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील वाद शमण्याचं नाव घेत नसून इस्रायलनं आता पुन्हा एकदा हमासवर जोरदार हल्ला (Air Strike) केला आहे. इस्रायलकडून हमासच्या मिलिटरी कंपाउंड (Military compound) भागात Air Strike करण्यात आला असून हमासकडून सातत्यानं काढण्यात येत असलेल्या कुरापतींना दिलेलं हे सडेतोड प्रत्युत्तर असल्याची प्रतिक्रिया इस्रायलकडून देण्यात आली आहे.

चार महिन्यांपासून संघर्ष विकोपाला

गेल्या चार महिन्यांपासून इस्रायल आणि हमासमधील संघर्ष चिघळला आहे. हमासकडून इस्रायलमध्ये फायर बलून सोडण्याचे प्रकार त्यानंतर वाढले आहेत. आतापर्यंत अनेकदा हमासकडून इस्रायलवर बलून हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे इस्रायलचं मोठं नुकसान होत असून या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलनं हमासवर जोरदार Air Strike केला आहे.

इस्रायलच्या संरक्षण दलानं जाहीर केलेल्या माहितीनुसार हमासच्या रॉकेट तयार करण्याचा कंपनीच्या गोडाऊन आणि कंपाउंडच्या परिसरात हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलवर सोडण्यात येणारे बलून याच कंपनीत तयार करण्यात येत होते, असं इस्रायलनं म्हटलं आहे.

मे महिन्यात 11 दिवस झाली लढाई

मे महिन्यात इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर हमासनं इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली होती. इस्रायलवर हमासकडून हजारो रॉकेट्स डागण्यात आली होती. मात्र इस्रायलकडे अँटि मिसाइल यंत्रणा असल्यामुळे यातील बहुतांश रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात यश आलं होतं. त्यानंतर हमासवर इस्रायलनं काही Air Strike करून हमासचं मुख्य कार्यालय असणारी इमारत उडवली होती.

हे वाचा - काय सांगता? कोरोना होऊन गेलेल्यांना लस घेण्याची गरजच नाही? जाणून घ्या सविस्तर

त्यानंतर हमासकडून बलून हल्ला करण्याचं प्रमाण वाढलं होतं. मधल्या काळात इस्रायलमध्ये सरकार बदललं. नवं सरकार हे कट्टर उजव्या विचारांचं असून पॅलेस्टाईनविरोधात कडक पवित्रा घेणारं असल्याचं मानलं जातं. सरकारनं सत्तेवर आल्यानंतर केलेल्या Air Strikeमधून हे सिद्धही केलं होतं. आता पुन्हा एकदा इस्रायलनं हमासवर हल्ला केला आहे.

First published: