पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसाचा मृत्यू

पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसाचा मृत्यू

इस्लामिक स्टेटनं स्वीकारली या हल्ल्याची जबाबदारी

  • Share this:

20 एप्रिल :  फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकीचे वारे वाहत असताना, पॅरिस शहर काल (गुरूवारी) रात्री पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. दोन दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असून एकाचा शोध सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटनं स्वीकारली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पॅरिस सातत्यानं दहशतवाद्यांचं लक्ष्य ठरतंय. 2015 मध्ये झालेल्या हल्ल्यापासून ते दहशतीच्या छायेखालीच आहेत. दोन वर्षांत दहशतवादी हल्ल्यात 230 जणांचा मृत्यू झाला आहे. असं असताना, गुरुवारी पुन्हा फ्रान्सची राजधानी हादरली.

पॅरिसमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या शाँज एलिजे या प्रसिद्ध रस्त्यावर बंदुकधारी हल्लेखोराने पोलिसांवर गोळीबार केला. रस्त्यावर पार्क केलेल्या पोलिसांच्या कारवर त्याने हल्ला केला. सुरुवातीला हा दहशतवादी हल्ला होता की चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला याविषयी संभ्रम होते. पण आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताच हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले.

First published: April 21, 2017, 10:37 AM IST

ताज्या बातम्या