7 कॅमेरा 7 अँगल कसं कोसळलं पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान, पाहा LIVE VIDEO

7 कॅमेरा 7 अँगल कसं कोसळलं पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान, पाहा LIVE VIDEO

लढाऊ विमान कोसळताना त्याचा स्पीड जास्त होता. या दुर्घटनेत वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 11 मार्च : पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मागच्या वर्षी याच विमानानं शूरविर अभिनंदन यांच्या लढाऊ विमानावर हल्ला केला होता. त्याच विमानाचा अपघात झाला आहे. 23 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये हवाई दलाकडून खास प्रात्याक्षिकं सादर कऱण्यात येणार आहेत. याचा सराव हे विमान करत होतं अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या विमानाचा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वेगवेगळ्या अँगलनं हे विमान कसं कोसळलं आणि सध्याची तिथली परिस्थिती काय आहे ते आपण पाहू शकता.

मोठा आवाज झाला आणि धुराचे लोळ उठल्यानं तिथले नागरिक घाबरले. नेमकं काय घडलं हे पाहाण्यासाठी तिथल्या स्थानिकांची झुंबड उडाली. तिथे लढाऊ विमान कोसळल्याचं त्यांना दिसलं. विमान पाहण्यासाठी स्थानिकांनी तोबा गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पाकिस्तानी हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पाकिस्तानचं एफ-16 विमान हे अमेरिकेकडून मिळालं होतं. मागच्या वर्षी भारताचे शूर वैमानिक अभिनंदन यांनी ह्या विमानानं केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं होतं आणि एफ 16 लढाऊ विमानाला पाडलं होतं.

विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि आग लागली. धुराचे लोळ उडाले. विमान इतक्या वेगात होतं की वैमानिकही या दुर्घटनेमध्ये वाचू शकला नाही. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेत विमानाचंही मोठं नुकसान झालं आहे.

या संपूर्ण घटनेबाबत पाकिस्तानी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी जरी मिठाची गुळणी घेतली असली तरीही हा अपघात नेमका कसा घडला हा सवाल उपस्थित केला जात आहे. आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता की हे विमान कोसळत असताना त्याचा वेग जास्त होता.

संपूर्ण परिसर पोलीस आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सील केला आहे. दुर्घटनास्थळी जाण्यासाठी मनाई केली आहे. तरीही हे लढाऊ विमान पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. नेमका हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलं नाही. वैमानिकाचं नियंत्रण सुटलं की विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला हे पोलिसांच्या तपासाअंती उघड होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: Mar 11, 2020 01:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading