मापूतो, 11 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेतील देश मोझाम्बिकमध्ये (Mozambique) ISISच्या दहशतवाद्यांनी एकाच गावातील 50 जणांचे शिरच्छेद केले. हा भयंकर प्रकार काबो डेलगाडो राज्यातील नानजबा गावात घडला. फुटबॉलच्या मैदानात 50 जणांना एकत्र जमा करून त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करून जंगलात फेकले. त्याचवेळी या गावातील महिलांचे अपहरण करून लैंगिक गुलाम बनविले गेले.
बीबीसी आणि डेलीमेलच्या वृत्तानुसार, गावातील महिलांच्या अपहरणानंतर दहशतवाद्यांच्या आणखी एका गटाने गावाला आग लावली. गावातील अनेक घरं जळून खाक झाली आहेत. दहशतवाद्यांनी गावात घोषणाबाजी केली. घरं जाळण्यास सुरुवात केल्यानंतर लोक घराबाहेर पडताच त्यांना पकडून नेण्यात आले आणि त्याचा शिरच्छेद केला.
वाचा-हेलिकॉप्टर चक्काचूर झालं पण रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी धडधडत राहिलं त्यातलं हृदय
मोझाम्बिकमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी खून केलेल्या 50 जणांपैकी बहुतेक तरुण आणि मुलं होती. या लोकांनी दहशतवाद्यांमध्ये सामील होण्यास नकार दिला आणि त्या बदल्यात त्यांना ही शिक्षा देण्यात आली. इस्लामिक दहशतवाद्यांनी अल्लाह अकबर म्हणवून या 50 जणांचा शिरच्छेद केला त्यांना त्यांचा मृतदेह कुटूंबाकडे सोपवण्यात आला.
वाचा-धक्कादायक! ब्लॅकमेल करायचा डॉक्टर; संतप्त नर्सने त्याचे तुकडे तुकडे करून शिजवले
मोझाम्बिकचे कॅबो डेलगॅडो राज्य नैसर्गिक वायूसाठी प्रख्यात आहे. 2017पासून आतापर्यंत तीन वर्षांत या भागात इस्लामिक दहशतवाद्यांनी 2000 लोकांना ठार केले आहे. या दहशतवाद्यांच्या भीतीमुळे सुमारे 4.30 लाख लोक राज्य सोडून वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत.
वाचा-माणसांची हत्या करुन त्यांच्या मांसाचा बनवायचे लोणचं; परिसरात उडाली खळबळ
याआधी अशीच घटना मार्च आणि एप्रिल महिन्यातही घडली होती. त्यावेळी देखील 50 लोकांचे शिरच्छेद करण्यात आले होते. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी एक्सॉन मोबिल आणि टोटल गॅस प्रोजेक्टजवळ या घटना घडवून आणल्या. या उर्जा विकास प्रकल्पांच्या आगमनानंतर गेल्या काही महिन्यांत या भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.