लंडन, 03 फेब्रुवारी : लंडनच्या दक्षिणेकडील स्ट्रेटम भागात रविवारी एका हल्लोखोराने चाकू हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात तो ठार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी आयसीसने घेतली आहे. हल्लेखोर हातात मोठा सुरा घेऊन रस्त्यावर फिरत होता. आणि लोकांना भोसकत त्यांच्या अंगावर वार करीत चालत होता. यामध्ये हल्लेखोराने अनेकांना जखमी केले.
याबाबत माहिती मिळताच मेट्रोपॉलिटन पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. ज्या भागात हल्ला सुरू होता, तेथे जाण्यापासून लोकांना रोखले. साध्या वेशात पोलिसांनी हल्लेखोराचा पाठलाग केला आणि त्याला जागीच ठार केले होते.
ISIS claims responsibility for London terror attack, according to its media wing
— Press Trust of India (@PTI_News) February 3, 2020
पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि लंडनचे महापौर सादिक खान यांनी ट्विट करीत आपात्कालिन परिस्थितीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि पोलिसांचे आभार मानले होते. 2018 मध्ये लंडनमधला सर्वाधिक सुरक्षीत भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले होते.
लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते. तर संसद भवन असल्यानं कडक सुरक्षा व्यवस्थाही असते. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेतास वाजता भरधाव वेगाने आलेल्या कारने सुरक्षा बॅरीकेट्स तोडून सायकलस्वार आणि काही नागरिकांना चिरडले होते.
खून करून ‘दृश्यम’ स्टाइलने लपवला मृतदेह, प्रेयसीच्या पतीची हत्या करणारा गजाआड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: London, Terror attack