Home /News /videsh /

'मोहम्मद पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेतला';ISIS ने सांगितलं काबूलमधील गुरुद्वारावरील हल्ल्याचं कारण

'मोहम्मद पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेतला';ISIS ने सांगितलं काबूलमधील गुरुद्वारावरील हल्ल्याचं कारण

अफगाणिस्तानमधील गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याची (Attack on Gurdwara in Kabul) जबाबदारी ISIS या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ISIS ने प्रेषित मोहम्मद यांच्या 'अपमानाचा' बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं म्हटलं आहे

    काबूल 19 जून : अफगाणिस्तानमधील गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याची (Attack on Gurdwara in Kabul) जबाबदारी ISIS या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, ISIS ने प्रेषित मोहम्मद यांच्या 'अपमानाचा' बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं म्हटलं आहे. अमाक साइटवर पोस्ट केलेल्या संदेशात, ISIS ने हिंदू, शीख आणि "धर्मविरोधी" लोकांना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या एका साथीदाराने गार्डला मारून आतमध्ये घुसत मशीनगनने गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून किमान सात जण जखमी झाले आहेत. गुरुद्वाराचे अधिकारी गुरनाम सिंग यांनी सांगितलं की हल्ल्याच्या वेळी सुमारे 30 लोक आत होते. या हल्ल्यात एक भाविक ठार झाला. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी कारमध्ये स्फोटके आणली होती पण लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याचा स्फोट झाला. अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी तकोर यांनी सांगितलं की, हल्लेखोरांनी गुरुद्वारावर किमान एक ग्रेनेड फेकला, ज्याने आग लागली. अफगाणिस्तानातील शिखांच्या मदतीला भारताची धाव, केंद्र सरकार देणार खास सवलत हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा भाजपने आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानुळे आधीच निलंबित केलं आहे . यासोबतच दिल्लीचे मीडिया प्रभारी नवीन जिंदाल यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ अनेक दहशतवादी संघटनांनी हल्ल्याची धमकी दिली होती. तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांची संख्या कमी झाली असली तरी, अलिकडच्या काही महिन्यांत झालेल्या अनेक हल्ल्यांनी देश हादरला आहे. यापैकी अनेक हल्ल्यांची जबाबदारी ISIS ने स्वीकारली आहे. ISIS हा सत्ताधारी तालिबानसारखा एक सुन्नी इस्लामी गट आहे, परंतु या दोन्ही गटांची वैचारिकता भिन्न आहे आणि ते एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; प्रार्थनास्थळी दिसले धुराचे लोट, घटनेचा Live Video एएफपीनुसार, काबुलमधील गुरुद्वारावर हा हल्ला भारतीय शिष्टमंडळाच्या अफगाणिस्तान दौऱ्यानंतर झाला. ही टीम अफगाणिस्तानला मानवतावादी मदत पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यासाठी तिथे गेली होती. अफगाण आणि भारतीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय दूतावास पुन्हा सुरू करण्याच्या शक्यतेवर या काळात तालिबानी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर ते बंद करण्यात आलं होतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    पुढील बातम्या