ISIचे माजी प्रमुख म्हणतात, पाकिस्तानला वाजपेयींसारखे पंतप्रधान हवे होते!

गुप्तहेर संघटनांवरचं पुस्तक ' Spy Chronicles RAW, ISI and the Illusion of peace'मध्ये दुर्रानी आणि भारतीय गुप्तहेर संघटना राॅचे माजी प्रमुख एएस दुलत यांची बातचीत छापलीय.

Sonali Deshpande | Updated On: May 22, 2018 02:20 PM IST

ISIचे माजी प्रमुख म्हणतात, पाकिस्तानला वाजपेयींसारखे पंतप्रधान हवे होते!

पाकिस्तान,२२ मे : पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे प्रमुख असद दुर्रानींनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं कौतुक केलं. ते म्हणालेत, पाकिस्तानला अटल बिहारी वाजपेयींसारखे पंतप्रधान मिळायला हवे होते.

गुप्तहेर संघटनांवरचं पुस्तक ' Spy Chronicles RAW, ISI and the Illusion of peace'मध्ये दुर्रानी आणि भारतीय गुप्तहेर संघटना राॅचे माजी प्रमुख एएस दुलत यांची बातचीत छापलीय. या दोघांचा समन्वय साधलाय पत्रकार आदित्य सिन्हांनी.

दुर्रानी म्हणाले, पाकिस्तानला कविमनाचा, दूरदृष्टी असलेले वाजपेयींसारखे पंतप्रधान मिळाले असते, तर खूप  बरं झालं असतं.

या पुस्तकात त्यांनी मोदी आणि मनमोहन सिंग यांची तुलना केलीय. त्यात त्यांनी म्हटलंय, मोदींनी भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी जास्त काम केलंय.

आपल्या मुलाखतीत मोदीच दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार, असंही ते म्हणालेत,

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2018 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close