'अरे, बघा मला पाय मिळाला', चिमुरड्या अनूचा व्हिडिओ व्हायरल

'अरे, बघा मला पाय मिळाला', चिमुरड्या अनूचा व्हिडिओ व्हायरल

लंडनजवळच्या एका शहरातल्या अनू नावाच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तिला कृत्रिम पाय लावलाय आणि तो पाय ती तिच्या मित्र मैत्रिणींना दाखवतेय..

  • Share this:

06 मे : छोटी मुलं काय करून तुमचं मन जिंकतील, काही नेम नाही राव.. लंडनजवळच्या एका शहरातल्या अनू नावाच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तिला कृत्रिम पाय लावलाय आणि तो पाय ती तिच्या मित्र मैत्रिणींना दाखवतेय..

शस्त्रक्रियेनंतर ती पहिल्यांदाच शाळेत गेलीय आणि ती चक्क खेळू शकतेय...चालू शकतेय...पळू शकतेय...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा..यतिच्याच नाही, तिच्या मैत्रिणींचा आनंदही बघण्यासारखाच होता. अनूचं वय ७ वर्ष.. बरमिंगममध्ये ती राहते.. हा परिवार भारतीय वंशाचा आहे. तिच्या पायाला जे लावलंय त्याला स्पोरटस् ब्लेडही म्हणतात. आपल्याला दिसायला तो फक्त एक कृत्रिम पाय आहे. पण या गोड चिमुरडीचं आयुष्य त्यामुळे बदललं. आज ती तिच्या वयाच्या मुलांप्रमाणे धावू खेळू शकतेय. तिच्या आत्मविश्वासात यानं किती भर पडली असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 06:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading