Home /News /videsh /

Afghanistan Crisis: तालिबाननं पंजशीर जिंकलं का? नॉर्दन आघाडीचं मोठं विधान

Afghanistan Crisis: तालिबाननं पंजशीर जिंकलं का? नॉर्दन आघाडीचं मोठं विधान

तालिबाननं आज सकाळी पंजशीरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची घोषणा केली होती. पण यावर आता नॉर्दन आघाडीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

तालिबाननं आज सकाळी पंजशीरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची घोषणा केली होती. पण यावर आता नॉर्दन आघाडीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Afghanistan Crisis: तालिबाननं आज सकाळी पंजशीरवर पूर्णपणे नियंत्रण (Taliban Captured Panjshir) मिळवल्याची घोषणा केली होती. पण यावर आता नॉर्दन आघाडीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

    काबूल, 06 सप्टेंबर: तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा (Taliban Control Afghanistan) मिळवल्यापासून देशात अराजक पसरलं आहे. तालिबान एकीकडे अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करत आहे. तर दुसरीकडे पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी लढा (Taliban battle for Panjshir) देत आहे. मागील काही दिवसांपासून पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडी आणि तालिबान यांच्या हिंसक घडामोडी घडत आहेत. त्यानंतर तालिबाननं आज सकाळी पंजशीरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची घोषणा केली होती. पण यावर आता नॉर्दन आघाडीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तालिबान विरोधी गटानं वृत्तसंस्था AFP ला सांगितलं की, तालिबान आणि नॉर्दन आघाडीचं युद्ध सध्या निर्णायक पातळीवर पोहोचलं आहे. तसेच तालिबान आणि त्यांच्या सहकारी संघटनांसोबत युद्ध अद्याप सुरूच आहे. या युद्धातून तूर्तास माघार घेतली जाणार नाही. तसेच तालिबाननं पंजशीर जिंकल्याचा दावा खोटा असल्याचंही नॉर्दन आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. हेही वाचा-NRF च्या बड्या नेत्याची हत्या; तालिबान पंजशीरवर अखेरचा घाव घालण्याच्या तयारीत दुसरीकडे, आज सकाळी तालिबाननं संपूर्ण पंजशीरवर ताबा मिळवल्याची घोषणा केली होती. याबाबतचं वृत्त वृत्तसंस्था AFP ने दिलं होतं. त्याचबरोबर तालिबाननं पंजशीरची राजधानी बझारक येथे आपला झेंडा फडकावत विजयी घोषणा दिली होती. मात्र तालिबानचा हा दावा NRF ने खोडून काढला आहे. तसेच तालिबान संघटनेसोबत अद्याप युद्ध सुरूच असल्याचा दावा NRF कडून करण्यात आला आहे. हेही वाचा-BREAKING: अफगाणिस्तानचा शेवटचा बुर्जही ढासळला; तालिबानचा पंजशीरवर पूर्णपणे ताबा दरम्याान काल अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी एका व्हिडीओ संदेश प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये सालेह यांनी सांगितलं होतं की, 'दोन्ही गटाकडून पंजशीरमध्ये युद्ध सुरूच आहे. 'आम्ही कठीण परिस्थितीत आहोत यात काही शंका नाही. तालिबान्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे. पण आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही अफगाणिस्तानसाठी शेवटपर्यंत लढत राहू. मी देश सोडल्याच्या बातम्या खोट्या आहेत हे लोकांना आश्वासन देण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर केला आहे.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या