Home /News /videsh /

महाभयंकर Coronvirus ला रोखणारी लस तयार पण.... काय आहे FACT?

महाभयंकर Coronvirus ला रोखणारी लस तयार पण.... काय आहे FACT?

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) कमीत कमी 20 लस (vaccine) विकसित झालेल्या असल्याचं म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 23 मार्च : जगभरात 3 लाखांपेक्षा जास्त लोकं कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) विळख्यात आहेत, तर या व्हायरसने 13 हजार लोकांचा बळी घेतला आहे. या व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत, आवश्यक ती पावलं उचलत आहेत. उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करून डॉक्टर उपचार करत आहे, तर दुसरीकडे या व्हायरसला रोखेल अशी लस (vaccine) शोधण्यासाठी शास्त्रज्ञांची धडपड सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization - WHO) जगभरात कोरोनाव्हायरसविरोधात कमीत कमी 20 लस विकसित झालेल्या असल्याचं म्हटलं आहे. त्यापैकी काही लसींचं ह्युमन ट्रायलही सुरू झालं आहे. मात्र या लसी खरंच यशस्वी आणि सुरक्षित असल्याची खात्री झाल्यापासून त्याला परवानगी मिळण्यासाठी किमान 18 महिने लागतील. म्हणजे दीड वर्षांनीच कोरोनाव्हायरसविरोधातील लस उपलब्ध होईल. हे वाचा - Coronavirus पश्चिम महाराष्ट्रात पसरला, 8 नव्या रुग्णांसह संख्या 97 वर चीनच्या वुहानमध्ये कोरोनाव्हायरसने थैमान घातल्यानंतर या देशाशिवाय इतर देशांमध्येही या व्हायरसला रोखण्याच्या लसीचा शोध सुरू झाला. ऑस्ट्रेलियातल्या एका शास्त्रज्ञांच्या टीमला या प्रक्रियेतलं पहिलं यश मिळालं. कॉमनवेल्थ सायंटिस्ट अँड इंड्स्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन Commonwealth Scientific and Industrial Research Organisation (CSIRO)या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी कोरोना (novel Coronavirus - nCov) विषाणूची लॅबमध्ये निर्मिती केली. रोगप्रतिबंधक लस तयार करण्याच्या दृष्टीने या विषाणूचा प्रीक्लिनिकल अभ्यास आवश्यक आहे. विशेष म्हणजे भारतीय शास्त्रज्ञ प्रा. एस. एस. वासन यांच्या नेतृत्वाखाली हे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. हे वाचा - Coronavirus हवेतून पसरू शकतो? WHO ने केलं सावध, काय सांगतं संशोधन? चिनी व्हायरसला रोखेल अशी प्रतिबंधात्मक लसही (preventive vaccine) पुण्यातही (pune) तयार झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum Institute of India)  कोरोनाव्हारसवर प्रतिबंधात्मक लस विकसित करण्यात यश मिळवलं आहे. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या (American biotechnology firm Codagenix) मदतीनं ही लस विकसित करण्यात आली आहे. ही लस प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध आहे. 6 महिन्यांनंतर  या लसीचं ह्युमन ट्रायल होईल म्हणजे एखाद्या व्यक्तीवर चाचणी केली जाईल. हे वाचा - असा होऊ शकतो महाभयंकर कोरोनाव्हायरचा नाश, चीनने सांगितला उपाय लंडनच्या (London) एचव्हीव्हो (Hvivo) कंपनीने कोरोनाव्हायरसविरोधात लस तयार केल्याचा दावा केला. ली मेलने (Daily mail) दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइटचॅपेलमधील (Whitechapel) क्विन मेरी बायोएंटरप्रायझेस इनोव्हेशन सेंटरने (Queen Mary BioEnterprises Innovation Centre) लसीच्या चाचणीसाठी ह्युमन ट्रायलही करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - फळं-भाज्या घेतानाही राहा सावध नाहीतर होऊ शकते Coronavirus ची लागण इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी जीवघेण्या कोरोना व्हायरसवर (Coronavirus) लस (vaccine) विकसित केल्याचा दावा केला आहे. इस्रायलची वेबसाइट Haaretz ने मेडिकल सोर्सच्या हवाल्याने वृत्त प्रसिद्ध केलं. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीत काम करणारे इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चमध्ये कोरोना व्हायरसवर रिसर्च सुरू आहे. या रिसर्चमध्ये इस्रायलच्या शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसचे गुण आणि जैविक तंत्रज्ञान समजून घेण्यात मोठं यश मिळालं आहे.आता त्यावर वैज्ञानिक क्षमतेसह एंटीबॉडीज लस विकसित करण्यात आली आहे. हे वाचा - आता अवघ्या अर्ध्या तासातच कोरोनाचं निदान, संशोधकांनी तयार केलं रॅपिड टेस्ट किट
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या