मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'आयुष्य अजून बेकार होणार'; या गायकाने नुकताच सुरु केला स्मार्टफोनचा वापर

'आयुष्य अजून बेकार होणार'; या गायकाने नुकताच सुरु केला स्मार्टफोनचा वापर

स्मार्टफोन (Smartphone) वापरता का? असा प्रश्न जर तुम्हाला कुणी विचारला तर तुम्ही अगदी सहजपणे उत्तर द्याल हो! तसं आताच्या काळात स्मार्टफोन वापरण्यात काहीच नाविन्य राहिलेलं नाही. अगदी लहान मुलं देखील अत्यंत सहजतेनं स्मार्टफोन हाताळताना दिसतात.

पुढे वाचा ...

  लंडन, 30 मे : स्मार्टफोन (Smartphone) वापरता का? असा प्रश्न जर तुम्हाला कुणी विचारला तर तुम्ही अगदी सहजपणे उत्तर द्याल हो! तसं आताच्या काळात स्मार्टफोन वापरण्यात काहीच नाविन्य राहिलेलं नाही. अगदी लहान मुलं देखील अत्यंत सहजतेनं स्मार्टफोन हाताळताना दिसतात. पण अशी एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने नुकताच पहिल्यांदा स्मार्टफोन फोन खरेदी केलाय. होय, हे खरंय. पूर्व लंडन येथील एका प्रख्यात बॅंडमधील प्रमुख गायकाने नुकताच स्मार्टफोन फोन खरेदी केला असून, त्यानंतर त्यांनी आता आयुष्य अधिक बेकार होणार, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

  जगभरात प्रसिध्द असलेल्या आयर्न मेडेन (Iron Maiden) या बॅण्ड मधील प्रमुख गायक ब्रुस डिकिन्सन (Bruss Dickenson) यांनी नुकत्याच युट्युबवर प्रक्षेपित झालेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट शेअर केली. एका चॅरिटी कार्यक्रमात सहभागी होण्याचं त्यांनी मान्य केल्यानं त्यांना स्मार्टफोन वापरणं गरजेचं होतं, त्यामुळे अखेरिस 2021 मध्ये त्यांनी स्मार्टफोन खरेदी केला आहे. याबाबत डिकिन्सन म्हणाले की या चॅरिटी कार्यक्रमासाठी (Charity Programme) एक अॅप डाऊनलोड करणं गरजेचं होतं. मात्र हे अॅप माझ्याकडे असलेल्या नोकिया 3310 या फोनवर डाऊनलोड करणं अशक्य होतं.

  एक वर्षापूर्वी मिळाला होता स्मार्टफोन

  या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, मला आयर्न मेडेनच्या कार्यालयाकडून सुमारे 1 वर्षापूर्वी एक सिमकार्ड आणि एक स्मार्टफोन देण्यात आला होता. यानंतर पर्यटकांसाठीचा चॅरिटी कार्यक्रम होईपर्यंत मी तो दूर ठेवून दिला आणि त्याला परत हात लावला नाही. त्यानंतर मात्र कार्यक्रमाच्या संयोजकांनी तुमची प्रत्येक कृती (Move) तुम्हाला अॅपमध्ये डाऊनलोड करता यावी यासाठी तुम्हाला स्मार्टफोन वापरावा लागेल असे सांगितले. मात्र त्यावेळी माझी स्थिती अशी होती की, अशा प्रकारच्या फोनमध्ये सिमकार्ड कसं टाकतात हे देखील मला माहिती नव्हतं. या मुलाखतीत डिकिन्सन यांनी आपले आयुष्य वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणारा नोकिया 3310 (Nokia 3310) हा फोन दाखवला. यालाच ते नवा आणि जुना नोकिया फोन संबोधतात.

  चॅरिटीसाठी डिकिन्सन जमा करत आहेत निधी

  डिकिसन यांनी यावेळी सांगितले की या चॅरिटी कार्यक्रमाने मला स्मार्टफोनमध्ये सिमकार्ड टाकण्यास प्रोत्साहित केले, त्यामुळेच आता माझ्याकडे स्मार्टफोन आहे. आता पासून माझे जीवन बेकार होणार, असे त्यांनी यावेळी विनोदी शैलीत सांगितले. परंतु, या मुलाखतीत त्यांनी आता ते कोणता स्मार्टफोन वापरतात याचा उल्लेख केला नाही.

  First published:

  Tags: Smartphone