फ्लोरिडात येतंय 'हे' विनाशकारी चक्रीवादळ

फ्लोरिडात येतंय 'हे' विनाशकारी चक्रीवादळ

या चक्रीवादळाचा वेग ताशी 257 किलोमीटर असेल.

  • Share this:

09 सप्टेंबर: अमेरिकेच्या पूर्वेला असणाऱ्या फ्लोरिडा राज्यात काही तासातच इर्मा नावाचं चक्रीवादळ धडकणार आहे. हे फ्लोरिडाच्या इतिहासातलं सर्वात विनाशकारी चक्रीवादळ ठरू शकतं, असा इशारा तिथल्या हवामान खात्यानं दिलाय. या चक्रीवादळाचा वेग ताशी 257 किलोमीटर असेल.

हजारो लोक आहे त्या परिस्थितीत शेजारच्या राज्यांमध्ये निघाले. तिथली संपूर्ण यंत्रणा कामाला लागलीय. आणि याचा परिणाम असा, की आणीबाणीच्या परिस्थितीतही तिथल्या महामार्गांवर वाहतूक कोंडी झालेली नाही. ज्यांना बाहेर जाणं शक्य होत नाहीय, त्यांच्यासाठी संक्रमण शिबिरं तयार आहेत. फ्लोरिडात येणारे रस्ते काही तास बंद होते. पण राज्यात इंधन आणि अन्नपुरवठा करण्यासाठी ते पुन्हा खुले झाले आहेत.

पण समस्या काही कमी होत नाही आहेत. फ्लोरिडा राज्यातले एटीएम रिकामे झालेत. चक्रीवादळ आलं, तर वीज पुरवठा खंडित होणार, आणि मग पैसे काढता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तेवढी कॅश लोक काढत आहेत.

पाळीव प्राण्यांसाठीची केंद्रही भरली आहेत. कारण जे लोक राज्याबाहेर जात आहेत, त्यातले अनेक जण पाळीव प्राण्यांना मागे ठेवून जात आहेत.

क्युबा आणि कॅरिबियनवरून आता इर्मा चक्रीवादळ अमेरिकेजवळ पोहोचलंय. जीवितहानी होऊ नये आणि नुकसान झालंच तर कमीत कमी होवो, हीच इच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2017 06:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading