सिंधुदुर्गचे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

सिंधुदुर्गचे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

लिओ यांचे वडील अशोक वराडकर 1960 साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथंच स्थायिक झाले. त्यांनी तिथं आयरिश नागरिक असलेल्या मरियमशी लग्न केलं.

  • Share this:

28 मे : आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोकणचे भूमिपूत्र लिओ वराडकर आहेत. लिओ वराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या गावचे रहिवासी आहे. लिओ यांचे वडील अशोक वराडकर 1960 साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथंच स्थायिक झाले. त्यांनी तिथं आयरिश नागरिक असलेल्या मरियमशी लग्न केलं.

लिओ यांचा जन्म हा आयर्लंडचा असला तरी त्यांची पाळंमुळं मात्र वराड या गावात आहे. वराड गावात त्यांचं घर आहे. लिओ हे पंतप्रधान व्हावेत असं वराडकरांना वाटतं. लिओसाठी त्यांनी गावच्या वेताळासमोर गाऱ्हाणं घातलंय.

गावात आता ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा नाही. या गावात आता आयर्लंडच्या निवडणुकीची चर्चा होऊ लागलीये. राणेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा गावात मागं पडून आता गावकऱ्यांत फक्त लिओचीच चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2017 04:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading