इराणचे टॉप Nuclear Scientist मोहसीन फखरीजादेह यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

इराणचे टॉप Nuclear Scientist मोहसीन फखरीजादेह यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

परराष्ट्र मुत्सद्दी मोहसीन फखरीजादेह यांना 'इराणी अणुबॉम्बचा जनक' म्हणत.

  • Share this:

तेहरान, 27 नोव्हेंबर : इराणचे टॉप अणुशास्त्रज्ञ (Iranian Scientist) मोहसीन फखरीजादेह (Mohsen Fakhrizadeh) यांच्या हत्येची बातमी समोर आली आहे. त्याच्या हत्येच्या बातमीमुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे.  एका अनौपचारिक स्रोताच्या माहितीनुसार ही घटना तेहरानजवळ घडली आणल्याचे सांगण्यात येत आहे. देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान असलेले इराणचे टॉप अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह महाबडी यांची तेहरानच्या पूर्वेस दामवंद येथे हत्या करण्यात आली आहे. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, 27 नोव्हेंबर, 2020 रोजी दामवंदच्या अबार्ड भागात या अणुशास्त्रज्ञांची हत्या करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पाश्चात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा असा विश्वास आहे की इराणच्या गुप्त अणस्त्र शस्त्रांच्या कार्यक्रमामागील मोहसीन फखरीजादेह यांचा हात होता. परराष्ट्र मुत्सद्दी मोहसीन फखरीजादेह यांना 'इराणी अणुबॉम्बचा जनक' म्हणत. आपला आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी असल्याचे इराण सांगत आला  आहे. 2010 ते 2012 दरम्यान इराणच्या चार अणुशास्त्रज्ञ हत्या झाली आहे आणि इराणने यासाठी इस्रायलला दोषी ठरवलं आहे.

कशी झाली हत्या?

शुक्रवारी इराणच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले की, “सशस्त्र अतिरेक्यांनी संरक्षण मंत्रालयाचे संशोधन व नाविन्य विभाग प्रमुख मोहसीन फखरीजादेह यांच्या कारला लक्ष्य केले. अतिरेकी आणि त्यांचे अंगरक्षक यांच्यात झालेल्या चकमकीत फखरीजादेह गंभीर जखमी झाले आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने, त्यांना वाचविण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आलं नाही. इराणी वृत्तसंस्था फारसने दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शींनी प्रथम स्फोटांचा आवाज ऐकला आणि त्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकला. एजन्सीनुसार, प्रत्यक्षदर्शींनी असेही म्हटले आहे की 3-4 अतिरेकी यामध्ये ठार झाले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: November 27, 2020, 10:08 PM IST
Tags: iran

ताज्या बातम्या