तेहरान, 17 फेब्रुवारी : दहशतवादाच्या मुद्यावरून आता इराणनं देखील पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. दहशतवाद्यांना पोसण्याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागणार आहे. शिवाय, दहशतवाद्यांना आसरा देणं आणि गप्प राहणं या गोष्टींचा अर्थ दहशतवादाला समर्थन देणं असाच होतो, असं देखील इराणनं म्हटलं आहे. बुधवारी इराणमध्ये देखील रिवॉल्यूशनरी गार्डसवर झालेल्या हल्ल्यामध्ये 27 सैनिकांचा मृत्यू झाला. हा हल्ला दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मद केला. त्यानंतर इराणच्या रिवॉल्यूशनरी गार्डसचे कमांडर मेजर जनरल मोहम्मद अली जाफर यांनी सरकारी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सरळपणे पाकला इशारा दिला आहे. पाकनं दहशतवादी संघटनांवर कारवाई न केल्यास त्याविरोधात इराण कठोर पावलं उचलेलं अशा शब्दात जाफर यांनी इराणला इशारा दिला आहे.
सुषमा स्वराज इराणमध्ये
पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इराणला भेट दिली. यावेळी त्यांनी इराणचे उप परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास यांच्याशी भेट घेत दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांनी एकत्रपणे पत्रक जारी करत दोन्ही देश हा दहशतवादाचा सामना करत आहेत. दहशतवादाचं समुळ उच्चाटन करण्यासाठी दोन्ही देश एकत्र असल्याचं म्हटलं आहे.
Iran & India suffered from two heinous terrorist attacks in the past few days resulted in big casualties. Today in my meeting with Sushma Swaraj the Indian FM, when she had a stopover in Tehran, we agreed on close cooperation to combat terrorism in the region. Enough is enough! pic.twitter.com/uvwlx45pZ6
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) February 16, 2019
">
पाकिस्तानविरोधात मोर्चेबांधणी
पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहिद झाले. त्यानंतर दहशतवाद्यांचं आश्रय स्थान असलेल्या पाकिस्तानविरोधात भारतानं आता कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहेत. त्यासाठी भारत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोर्चे बांधणी करत आहे. अमेरिका आणि रशियानं भारताला दहशतवादाविरोधात पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. शिवाय, भारतानं देखील पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. तसेच पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावले आहे. त्यानंतर आता इराणनं देखील भारताला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.
'मेरे घर मे हैं मेरी बुढी माँ', शहीद नितीन राठोड यांच्या नावाने भावुक VIDEO व्हायरल