जणू आगीचा गोळाच आकाशातून पडला, इराणमधील विमान दुर्घटनेचा पहिला VIDEO समोर

जणू आगीचा गोळाच आकाशातून पडला, इराणमधील विमान दुर्घटनेचा पहिला VIDEO समोर

इराणमध्ये 180 प्रवाशी घेऊन जाणाऱ्या युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला. यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

तेहरान, 09 डिसेंबर : इराणमध्ये 180 प्रवाशी घेऊन जाणाऱ्या युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला. यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तेहरान आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. युक्रेनचं बोईंग 737 हे विमान 180 प्रवाशी घेऊन जात होतं. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेनं इराणचा टॉप कमांडर सुलेमानीला ठार केल्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. यातच इराणने मंगळवारी मध्यरात्री अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला. यानंतर पहाटेच्या सुमारास तेहरान इथं विमान कोसळल्याची दुर्घटना घडल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, इराण-अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाला असून इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणने अमेरिकन दुतावासावर हल्ले केले होते. त्यानंतर पुन्हा इराणने अमेरिकन लष्कराच्या दोन तळांवर डझनभर क्षेपणास्त्र डागली आहेत. इराकमध्ये असलेल्या दोन अमेरिकन लष्कराच्या तळांवर इराणने हा हल्ला केला आहे. इरबिल आणि अल असद या लष्करी तळांचा समावेश आहे. इराणने यात 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली.

वाचा : All is well! इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे Tweet

इराणने मध्यरात्री हल्ला केल्यानंतर काही वेळाने पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करणं सुरुच असल्याचे वृत्त अल जझीराने दिले आहे. सुरुवातीला केलेल्या 12 क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर तासाभराने पुन्हा क्षेपणास्त्र डागण्यास इराणने सुरुवात केली.

वाचा : सुलेमानीच्या हत्येचा बदला! कसा झाला अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला, पाहा VIDEO

First published: January 8, 2020, 11:06 AM IST
Tags: iran

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading