मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

युक्रेनचं विमान इराणने पाडलं, अमेरिकेनंतर कॅनडाचाही आरोप

युक्रेनचं विमान इराणने पाडलं, अमेरिकेनंतर कॅनडाचाही आरोप

इराणच्याच मिसाइल हल्ल्याने विमानाची दुर्घटना झाल्याचा दावा अमेरिकेनं केला होता. आता कॅनडानेसुद्धा युक्रेनच्या प्रवासी विमानाच्या दुर्घटनेत इराणची चूक असल्याचं म्हटलं आहे.

इराणच्याच मिसाइल हल्ल्याने विमानाची दुर्घटना झाल्याचा दावा अमेरिकेनं केला होता. आता कॅनडानेसुद्धा युक्रेनच्या प्रवासी विमानाच्या दुर्घटनेत इराणची चूक असल्याचं म्हटलं आहे.

इराणच्याच मिसाइल हल्ल्याने विमानाची दुर्घटना झाल्याचा दावा अमेरिकेनं केला होता. आता कॅनडानेसुद्धा युक्रेनच्या प्रवासी विमानाच्या दुर्घटनेत इराणची चूक असल्याचं म्हटलं आहे.

  • Published by:  Suraj Yadav
वॉशिंगटन, 10 जानेवारी : इराणमध्ये युक्रेनचं 176 प्रवासी असलेलं विमान गुरुवारी कोसळलं होतं. यामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इराणच्याच मिसाइल हल्ल्याने विमानाची दुर्घटना झाल्याचा दावा अमेरिकेनं केला होता. आता कॅनडानेसुद्धा युक्रेनच्या प्रवासी विमानाच्या दुर्घटनेत इराणची चूक असल्याचं म्हटलं आहे. इराणकडून अजाणतेपणे चूक झाल्याचं कॅनडाने म्हटलं आहे. तेहरानपासून 46 किलोमीटर अंतरावर झालेल्या या दुर्घटनेत कॅनडातील 63 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, इराणने विमानावर मिसाइल हल्ल्याचा दावा फेटाळून लावत कॅनडाकडे गुप्तचर संस्थेचा अहवाल मागितला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू यांनी टोरांटो इथं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं की, 'आमच्याकडे अनेक गुप्तचर सूत्रांनी दिलेली माहिती आहे आणि त्यातील पुराव्यानुसार युक्रेनच्या प्रवासी विमानाला इराणी मिसाइलने पाडल्याचं दिसत आहे.' विमान पडल्याच्या दुर्घटनेआधी काही तास अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तेहरानजवळ युक्रेनचं विमान उडताना दिसत आहे. यावेळी त्याला काहीतरी धडकले आणि विमानाचा स्फोट झाला. न्य़ूयॉर्क टाइम्सने व्हिडिओची सत्यता स्पष्ट करताना म्हटलं आहे. मिसाइल धडकल्यानंतर लहान स्फोट झाला पण पूर्ण क्रॅश नाही झाले. यानंतर काही वेळ विमान उडत होते. दुसरीकडे अमेरिकन सॅटेलाइटने युक्रेनच्या विमान क्रॅश होण्याच्या आधी दोन मिसाइल लाँच झाल्याचं डिटेक्ट केलं आहे.  ही मिसाइल रशियात तयार झालेली असून इराणही त्याचा वापर करते असं म्हटलं आहे. 33 सेकंदात झाला 180 प्रवाशांचा मृत्यू! समोर आला युक्रेन विमान क्रॅशचा VIDEO अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, युक्रेन विमान दुर्घटनेला इराण जबाबदार असू शकतं. यावेळी ट्रम्प यांनी थेट इराणचे नाव घेतले नाही. ते म्हणाले की, दुसऱ्या पक्षाकडून कोणीतरी चूक केली आहे. काही लोक म्हणत आहेत की तांत्रिक बिघाड आहे पण मला वाटतं की हा प्रश्नच नाही. चुकून झाले असेल. दरम्यान, इराण-अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाला असून इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणने अमेरिकन दुतावासावर हल्ले केले होते. त्यानंतर पुन्हा इराणने अमेरिकन लष्कराच्या दोन तळांवर डझनभर क्षेपणास्त्र डागली आहेत. इराकमध्ये असलेल्या दोन अमेरिकन लष्कराच्या तळांवर इराणने हा हल्ला केला आहे. इरबिल आणि अल असद या लष्करी तळांचा समावेश आहे. इराणने यात 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली. जणू आगीचा गोळाच आकाशातून पडला, इराणमधील विमान दुर्घटनेचा पहिला VIDEO समोर
First published:

Tags: Iran

पुढील बातम्या