तेहरान, 11 सप्टेंबर : Coronavirus pandemic च्या संकटात शाळा सुरू कधी करायच्या, कशा प्रकारे सुरू करायच्या यावर चिंता व्यक्त होत आहे. अमेरिकेत सुरू झालेल्या शाळा बंद कराव्या लागल्या. पण इराणमधील एक शाळा सात महिन्यांनी पुन्हा सुरू झाली आहे. या शाळेचा फोटो आता सोशल मीडियावर VIRAL होतो आहे.
कोरोनाच्या या संकटात इराणची ही चिमुकली शाळा कशी काळजी घेते आहे, हे पाहण्यासारखं आहे. विद्यार्थ्यांना एका छोट्या तंबूत बसवून दिलेलं शिक्षण आणि त्यातलं सोशल डिस्टन्सिंग याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे़. त्यानंतर आता त्यावर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत.
कोरोनाने आपल्या सर्वांचं जीवन बदललं आहे. कोरोनाने अनेक नव्या गोष्टी शिकविल्या आहेत़. यामध्ये स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणं आदी बाबींचा उल्लेख करता येईल. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये इराणमधील या शाळेतील विद्यार्थी एका पारदर्शक नेटमध्ये बसले आहेत. त्याचबरोबर एकमेकांपासून ते लांब अंतरावर बसलेले दिसून येत आहेत.
School in the age of pandemic in Iran. pic.twitter.com/Gg6v7KMhbh
— Farnaz Fassihi (@farnazfassihi) September 8, 2020
फरनाज फाशिही यांनी हा फोटो Twiter शेअर केला असून याला 8 हजारांवर लाईक्स व तीन हजार रिट्वीटस झाले आहेत़. यावर एका पालकाने प्रतिक्रिया दिली असून माझी मुले आज पहिल्या दिवशीचा क्लास आटोपून घरी परतली. ती दिवसभर मास्क परिधान करून होती. मित्रांपासून सहा फूट अंतरावर होती आणि त्यांनी कसलीही देवाणघेवाण केली नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, ही संकल्पना सार्वजनिकरीत्या कशी वापरता येणार? प्रत्येक शाळेला ते शक्य होणार नाही. तर अन्य एकाने म्हटले आहे की, ही संकल्पना चांगली आहे. मात्र जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे ही संकल्पना शक्य आहे का?
रॉयटर्स या वृत्तसंस्थानुसार इराणमधील शाळा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत. 1.5 कोटी विद्यार्थी सात महिन्यांनंतर पाच सप्टेंबरला शाळेत आले. या वर्षी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देणे ही आमच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांनी म्हटले आहे त्यामुळे आता जगभरात बाकी देशांमध्ये कशाप्रकारे शाळा सुरू होतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.