Home /News /videsh /

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा 'बाहुबली' जनरल ठार

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा 'बाहुबली' जनरल ठार

अमेरिकेने केलेल्या एका हल्ल्यात इराकची राजधानी बगदादमध्ये कदस फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाला.

    बगदाद, 03 डिसेंबर : अमेरिकेने केलेल्या रॉकेट हल्ल्यात इराकची राजधानी बगदादमध्ये कदस फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाला. सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे कूच करत होता तेव्हा अमेरिकेनं हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू महदी अल मुहांदिस हासुद्धा ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुलेमानी ठार झाल्याच्या वृत्ताला इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलनं दुजोरा दिला आहे. सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जातो. त्याने सिरियामध्ये जाळं पसरवलं होतं तसंच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करण्याचाही आरोप त्याच्यावर होता. अमेरिका त्याच्या मागावर होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच कोणतेही टेक्स्ट न वापरता फक्त अमेरिकेच्या झेंड्याचा फोटो ट्विट केला आहे. गेल्या वर्षीपासून इराण-अमेरिका संघर्ष वाढला होता. अमेरिकेने ईराणवर अनेक निर्बंध घातले आहेत. इराणवर केलेल्या या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणचे समर्थन करणाऱ्या मिलिशियाने बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केल्यानतंर अमेरिकेनं हा हल्ला केला आहे. डोनाल़्ड ट्रम्प यांनी एक दिवस आधी याबाबत इशाराही दिला होता. सुलेमानी इराणच्या इस्लामिक रिवॉल्यूशनरी सैन्यातील शक्तीशाली अशा कदस फोर्सचा प्रमुख होता. त्याला आणण्यासाटी अल मुहांदिस गेला होता. सुलेमानीचे विमान लेबनानमधून आलं होतं. सुलेमानी विमानातून उतरला आणि मुहांदिसला भेटत असतानाच अमेरिकेनं रॉकेट हल्ला केला. यात 7 जण मारले गेले. सुलेमानीची ओळख मृतदेहाच्या हातात असलेल्या अंगठीवरून करण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: America, Iran, Iraq

    पुढील बातम्या