'176 प्रवाशांचे विमान चुकून पाडलं', इराणच्या लष्कराची कबुली

'176 प्रवाशांचे विमान चुकून पाडलं', इराणच्या लष्कराची कबुली

इराणमध्ये 176 प्रवाशांच्या विमान दुर्घटनेत आता खळबळजनक खुलासा झाला आहे. इराण-अमेरिका यांच्या युद्धाच्या ठिणगीत नाहक 176 प्रवाशांना प्राण गमवावा लागला.

  • Share this:

तेहरान, 11 जानेवारी : इराणमध्ये 176 प्रवाशांच्या विमान दुर्घटनेत आता खळबळजनक खुलासा झाला आहे. इराण-अमेरिका यांच्या युद्धाच्या ठिणगीत नाहक 176 प्रवाशांना प्राण गमवावा लागला. युक्रेनचं 176 प्रवासी असलेलं विमान चुकून पाडलं गेल्याची कबुली इराणने दिल्याचा दावा तिथल्या स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. असोसिएट प्रेसनेसुद्धा हे वृत्त प्रसारीत केलं आहे.

इराणमध्ये युक्रेनचं 176 प्रवासी असलेलं विमान गुरुवारी कोसळलं होतं. यामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इराणच्याच मिसाइल हल्ल्याने विमानाची दुर्घटना झाल्याचा दावा अमेरिकेनं केला होता. त्यानंतर कॅनडानेसुद्धा युक्रेनच्या प्रवासी विमानाच्या दुर्घटनेत इराणची चूक असल्याचं म्हटलं होतं. इराणकडून अजाणतेपणे चूक झाल्याचं कॅनडाने म्हटलं. तेहरानपासून 46 किलोमीटर अंतरावर झालेल्या या दुर्घटनेत फक्त कॅनडातील 63 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, युक्रेन विमान दुर्घटनेला इराण जबाबदार असू शकतं. यावेळी ट्रम्प यांनी थेट इराणचे नाव घेतले नाही. ते म्हणाले की, दुसऱ्या पक्षाकडून कोणीतरी चूक केली आहे. काही लोक म्हणत आहेत की तांत्रिक बिघाड आहे पण मला वाटतं की हा प्रश्नच नाही. चुकून झाले असेल.

दरम्यान, इराण-अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाला असून इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणने अमेरिकन दुतावासावर हल्ले केले होते. त्यानंतर पुन्हा इराणने अमेरिकन लष्कराच्या दोन तळांवर डझनभर क्षेपणास्त्र डागली आहेत. इराकमध्ये असलेल्या दोन अमेरिकन लष्कराच्या तळांवर इराणने हा हल्ला केला आहे. इरबिल आणि अल असद या लष्करी तळांचा समावेश आहे. इराणने यात 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली.

Published by: Suraj Yadav
First published: January 11, 2020, 9:43 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading