Home /News /videsh /

'विष प्या आणि कोरोना घालवा', एका अफवेने घेतला शेकडो लोकांचा जीव

'विष प्या आणि कोरोना घालवा', एका अफवेने घेतला शेकडो लोकांचा जीव

नेदरलँड - आतापर्यंत 11,750 लोकांना लागण आणि 864 मृत्यू.

नेदरलँड - आतापर्यंत 11,750 लोकांना लागण आणि 864 मृत्यू.

कोरोनाने नाही तर एका अफवेने घेतला शेकडो लोकांचा जीव, 1200 लोक गंभीर अवस्थेत.

    तेहरान, 28 मार्च : कोरोनाने सध्या साऱ्या जगाचे कंबरडे मो़डले आहे. चीनच्या वुहानपासून आलेल्या या व्हायरसने इटली आणि इराणमध्य़े थैमान घातले. इराणमध्ये मृतांच्या संख्येत अचानक वाढ झाली. आरोग्य सेवांच्या अभावामुळे आणि विषाणूबद्दल कमी माहितीमुळे यापूर्वीच 2 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता इराणमध्ये कोरोनामुळे नाही तर एका अफवेने शेकडो लोकांचा जीव घेतला. इराणच्या तेहरानमध्ये एकाने कोरोनाचा नाश विष पिऊन होतो, अशी अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर, एक हजाराहून अधिक लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाव्हायरसच्या भीतीपोटी इराणी आरोग्य सेवेचे जनतेने दारू पिण्यावर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. तर, काही लोकांनी मिथेनॉल पिण्यामुळे विषाणूंविरूद्ध लढायला मदत होते, अशी अफवा पसरवण्यात आली होती. यानंतर शेकडो लोकांनी हे विष प्यायले. इराण मीडियाने सांगितले आहे की मेथेनॉलच्या वापरामुळे सुमारे 300 लोक मरण पावले आहेत आणि 1000 हून अधिक गंभीर आजारी झाले आहेत. वाचा-असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो दुसरीकडे इराणमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या 29 हजार घटनांची नोंद झाली आहे, तर 2,200 हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मत आहे की संसदीय निवडणूकीपूर्वी इराण मृत्यूची संख्या लपवत आहे. वाचा-अमेरिकेत 24 तासांत 18 हजार लोकांना कोरोनाची लागण तर 345 लोकांचा मृत्यू अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार इराणमध्ये बनावट उपाय सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. देशभर हा विषाणू पसरण्यापूर्वी सरकारने बरीच पावले उचलली. ओस्लो येथील क्लिनिकल विषारी तज्ञ डॉक्टर एरिक होवडा म्हणाले की, व्हायरस पसरत आहे आणि लोक मरत आहेत. मात्र अशा अफवांमुळे लोकांचा जीव जाणे वाईट आहे. इराणमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापेक्षा अशा अफवांमुळे जास्त लोकांचा जीव जाऊ शकतो. वाचा-पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची लागण? एका बातमीने पाक हादरलं
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Iran

    पुढील बातम्या