इराणच्या संसदेवर हल्ला; तीन जण जखमी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2017 03:33 PM IST

इराणच्या संसदेवर हल्ला; तीन जण जखमी

07 जून : इराणच्या संसदेवर काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 जणं जखमी झाले आहे. संसदेच्या आवारात घुसून हा बेछूट गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी काही लोकांना ओलीस ठेवल्याचंही बोललं जात आहे. इराणच्या लष्करानं संसद परिसराचा ताबा घेतला असून हल्लेखोरांशी चकमक सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या संसदेवरील हल्ल्यात 2 नागरिक तर 1 सुरक्षा अधिकारी जखमी झाला आहे. हल्लेखोरांमध्ये तिघांचा समावेश असून त्यांच्यापैकी दोघांकडं एके-47 रायफल आणि एकाकडं हँडगन आहे.

हल्ल्यात मारल्या गेलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याचा मृतदेह संसदेच्या आवारातून बाहेर काढण्यात आला आहे. तर ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी इराणी लष्करानं ऑपरेशनही सुरू केलं आहे. हा हल्ला नेमका कुणी आणि का केला, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...